विशेष प्रतिनिधी
मुंबई : Thackeray Group भारत–पाक सामन्याविरोधात आंदोलन करायचे असेल तर आधी आपल्या पक्षातील मिलिंद नार्वेकरांना क्रिकेट समितीतून पायउतार करा. राष्ट्रवाद दाखवायचा असेल तर सुरुवात घरापासून करा. पण उद्धव ठाकरेंमध्ये ती हिंमत नाही. ते स्वतःच्या लोकांवर बोट ठेवणार नाहीत आणि ढोंगी आंदोलन करणार आहेत, असे म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.Thackeray Group
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत असे म्हणत आहे की शिवसेना अमित भाई शहा यांचे दुकान आहे. मग उबाठा काय राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे दुकान आहे का? ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून उबाठा गटाच्या भूमिका पाहिल्या तर लक्षात येते की उबाठा हे राहुल गांधी यांचे दुकान आहे. ज्या पद्धतीने राहुल गांधी आणि काँग्रेस बोलत आहेत त्या पद्धतीने संजय राऊत बोलत आहेत, त्यांना एकनाथ शिंदे यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी माझा पक्षाची काँग्रेस होत असेल तर दुकान बंद करेल असे वारंवार सांगितले होते तरी तुम्ही सोनिया गांधी यांचे लागुन चालन करत आहात, त्यामुळे उबाठा काँग्रेसचे दुकान आहे हे सिद्ध होत आहे.Thackeray Group
मग खेळाडूबद्दल बोलण्याची हिंमत ठेवा
नवनाथ बन म्हणाले की, खेळाडूंनी आजच्या भारत-पाकिस्तान मॅचवर बहिष्कार टाकावा अशी मागणी संजय राऊत करत आहेत, ही मागणी करण्याचा अधिकार राऊत यांच्याकडे नाही. आजच्या सामन्यात भारताचा विजय होणार आहे. भारत जिंकल्यानंतर मातोश्रीच्या गेटबाहेर, भांडुपमधील तुमच्या घराबाहेर आणि सामनाच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडा. पण पाकिस्तान जिंकल्यावर तुम्हाला जास्त आनंद होतो. ढोंगी देशप्रेमाने महाराष्ट्राची फसवणूक थांबवा. तुम्ही खेळाडूंना बोलण्यापूर्वी आपल्या घराबाहेर फटाके फोडा. तुम्हाला पाकिस्तान जिंकल्यानंतर जास्त आनंद होतो. आज आपले खेळाडू पाकिस्तानचा पराभव करणार आहेत. तुम्ही पहिले फटाके फोडा मग खेळाडूबद्दल बोलण्याची हिंमत ठेवा.
राऊतांनी सर्वाधिक सट्टा लावला
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी कितीचा जुगार भारत-पाकिस्तान मॅचवर लावला आहे. माझी माहिती आहे की,भांडुपमधून त्यांनी सर्वाधिक सट्टा लावला आहे. सट्टाबाजार काय असतो हे तुम्हालाच चांगले माहिती आहे. अलिबागच्या घरात ते लपून सामना पाहणार आहेत, याची माहिती आम्हाला आहे. स्वतः जुगार खेळतात आणि इतरांना शिकवतात. पाकिस्तान सामन्यावर कोटींचा जुगार लावणाऱ्या राऊतांनी देशभक्ती वर भाषण करणं म्हणजे ढोंग आहे.
महाराष्ट्राला तुमचे खोटं प्रेम चांगले माहित
नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे व संजय राऊत आज पंतप्रधानांना कुंकू पाठवणार म्हणत आहेत. खरी हिंमत असेल तर भेंडीबाजार, मालवणीमध्ये जा आणि देशभक्ती सिद्ध करा. विनाकारण देशप्रेमाच्या नावाने छातीबडवणे थांबवा. महाराष्ट्राला तुमचे खोटं प्रेम चांगले माहित आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App