विशेष प्रतिनिधी
मुंबई : Supriya Sule राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या “मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो, मग तुम्हाला काय अडचण आहे?” या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. भाजपने या वक्तव्याचा तीव्र निषेध करत सुप्रिया सुळे यांच्यावर जहरी टीका केली आहे. मौलाना शरद पवारांच्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार, असे भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी म्हटले.Supriya Sule
सुप्रिया सुळे यांनी शनिवारी दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्याला हजेरी लावली होती. कार्यक्रमात भाषण दरम्यान मंत्री नरहरी झिरवळ यांच्या समोरच सुप्रिया सुळे यांनी सरकारवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी मांसाहारबाबतचे व्यक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.Supriya Sule
भाजपची सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका
भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. “पिढ्यानपिढ्या शाकाहाराची परंपरा जपणाऱ्या वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाला मांसाहार केलेला चालतो, असे बोलणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे,” असे भोसले म्हणाले. “जर तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करू शकत नसाल, तर किमान अपमान तरी करू नका. पण मौलाना शरद पवारांच्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार?” अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.
सुप्रिया सुळेंना वारकरी उत्तर देतील
सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता, “याचे उत्तर मी देणार नाही, महाराष्ट्रातील तमाम वारकरी उत्तर देतील,” असे त्यांनी म्हटले.
सुप्रिया सुळेंना हे शोभणारे नाही
याबाबत प्रवीण दरेकर यांना विचारले असता, कोणी काय खायचे ते खा, बंदी नाही. आपला महाराष्ट्र हा वारकरी संप्रदायाचा आहे. सुप्रिया सुळे यांना हे शोभणारे नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
भुजबळांनी एका वाक्यात विषय संपवला
सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता, त्यांनी हा विषय एकाच वाक्यात उरकला. कुणी काय खावे याच्याकडे जास्त लक्ष देण्याचे गरज नाही, असे भुजबळ म्हणालेत.
नेमके काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे यांनी दिंडोरातील समारंभात मटण खाण्याबाबत बोलताना म्हटले की, ‘मी रामकृष्ण हरीवाली आहे. फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी मटण खाते. मी त्यांच्या सारखी खोटं बोलत नाही. खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझे आई वडील, सासू सासरे, नवरा खातो, आमच्या पैशाने खातो आपण कोणाला मिंदे नाही, जे आहे डंके की चोट पर आहे, दिलं खोल कर चलो. खाते तर खाते खाल्लं तर काय पाप केले काय?
पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, ‘मी नॉनव्हेज खाते, फक्त माळ घालत नाही, कधी कधी मोह होतो. त्यामुळे माळ घालत नाही. ज्या दिवशी माळ घालेल, त्या दिवशी मटण खाणे सोडून दिले असे समजा.’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App