विशेष प्रतिनिधी
मुंबई : BJP Slams राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करत असल्याची तिखट टीका भाजपने केली आहे. शरद पवार आता शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करत आहेत. पण इतिहासात डोकावले, तर त्यांच्या सत्तेच्या काळात आत्महत्या केलेल्या अनेक शेतकऱ्यांचे आत्मे त्यांना प्रश्न विचारताना दिसतील, असे भाजपने म्हटले आहे.BJP Slams
शरद पवार गटाने सोमवारी नाशिकमध्ये सोमवारी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर टीकेची प्रचंड झोड उठवण्यात आली. या पार्श्वभूमीवर भाजपने पवारांवर पलटवार केला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये मंगळवारी म्हणाले, शरद पवार आता शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करतायत, पण इतिहासात डोकावलं तर तुमच्या सत्तेच्या काळात केलेल्या हजारो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे आत्मे प्रश्न विचारताना दिसतील. आज शेतकऱ्यांच्या मोर्चा काढून जी भाषणे ठोकता, त्यातील शहाणपणा तेव्हा कुठे गायब झाला होता?BJP Slams
हेच पवार कृषिमंत्री असताना 55 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. वेगळ्या शब्दात मांडायचं तर, पवार साहेबांच्या 50 वर्षाच्या राजकीय आयुष्यात रोज सरासरी 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ज्यांच्या कारकिर्दीचा दिवस शेतकरी आत्महत्येविना सरला नाही त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही? ️
शरद पवारांवर टीकेची झोड
शेतकऱ्यांनी मोर्चा काढला तर त्यांच्या मागण्यांवर बोलण्याऐवजी त्यांच्या नेत्यांची जात काढणारे शरद पवार, शेतकरी कर्जमाफी केल्याचा डांगोरा पिटत प्रत्यक्षात शेतकऱ्यांना बाबाजी का ठुल्ला देत बॅंकांची भरपाई करणारे शरद पवार, कांद्याचे भाव कधी वाढतील या प्रश्नाचे ‘मी ज्योतिषी नाही’ असे उत्तर देणारे शरद पवार, लवासासाठी हजारो एकर शेती घेताना ज्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला, तेही शरद पवार, स्वामीनाथन समितीचा अहवाल सोयीस्कर दाबणारेदेखील, शरद पवारच, सगळ्याच प्रश्नांची सुरुवातच इथे झाली आणि उत्तरेही इथेच येऊन थांबतात.
शेतकरीप्रेमाची कितीही सरकारविरोधी भाषणे करा मात्र आपल्या इतिहासाचा हाच भयाण वास्तव चेहरा आहे. किती उगाळायचा इतिहास, उगाळेल तेवढा काळाच, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
सत्तेची मलई खाण्याचा आणखी एक डाव
केशव उपाध्ये यांनी अन्य एका ट्विटद्वारेही पवारांवर केवळ निवडणुकीसाठी मोर्चा काढण्याचे नाटक सुरू केल्याचा आरोप केला आहे. देवा तूच सांग, शरद पवारांचं हे कॅम्पेन खरंच जनतेच्या हितासाठी आहे की फक्त निवडणुकीची नौटंकी? देवा तूच सांग, ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ तत्त्वांचा ढोल बडवणारे हे लोक सत्तेत असताना सामाजिक न्यायाला का चुरगाळत राहिले? देवा तूच सांग, शरद पवारांचं हे कॅम्पेन म्हणजे जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकून सत्तेची मलई खाण्याचा आणखी एक डाव नाही का?
देवा तूच सांग, सत्तेत असताना भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनाला खतपाणी घालणारे हे शरद पवार आता विकासाची भाषा का करतायत? देवा तूच सांग, निवडणुका जवळ आल्या की शरद पवारांना शेतकरी आणि गोरगरीब का आठवतात, बाकी वेळ का सत्तेच्या गोटात रममाण होतात? देवा तूच सांग, लवासासारख्या प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करणारे आता कॅम्पेनमध्ये शेतकरी हिताची गाणी का गातायत?, असे विविध प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App