भाजप + शिवसेनेचे 25 पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध विजयी; पण फक्त आरोप करण्याव्यतिरिक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दुसरे काय केले??

BJP Shivsena

नाशिक : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि शिवसेनेचे 25 पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आले. कारण त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या सगळ्या पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतली. त्यासाठी मोठा घोडेबाजार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. पण नुसते आरोप प्रत्यारोप करण्याखेरीज महाविकास आघाडीचे नेत्यांनी दुसरे केले तरी काय??, असा गंभीर सवाल या निमित्ताने समोर आला.BJP Shivsena 25 corporators unapossed

महाराष्ट्रात कल्याण डोंबिवली मध्ये भाजप शिवसेनेचे 9 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. त्या पाठोपाठ ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला शिवसेनेचे 5 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. आता पनवेल महापालिकेत भाजपचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्याचबरोबर पुणे महापालिकेत भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले. याआधी धुळे जळगाव मध्ये सुद्धा असाच प्रकार घडला.



– रवींद्र चव्हाण, एकनाथ शिंदे यांचे “चमत्कार”

या सगळ्या प्रकारात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “राजकीय चमत्कार” घडविला, अशा बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या. पण त्यापलीकडे जाऊन हा “चमत्कार” ते का घडवू शकले आणि त्यांना तो चमत्कार घडवून आणताना महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी विरोध का केला नाही??, त्यांच्या चमत्काराविरुद्ध ठोस पुरावे देऊन त्यांना अडचणीत का आणले नाही??, असे सवाल मात्र मराठी माध्यमांनी केले नाहीत.

एकीकडे असे चमत्कार सुरू असताना दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आपल्या पक्षातल्या बंडखोरांमुळे हैराण झालेत. आपल्या पक्षातल्या बंडखोरांना त्यांना आवरता आले नाही. बंडखोरांनी दोन्ही पक्षांमधल्या प्रमुख नेत्यांच्या नाकात दम आणला. अशावेळी जर ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीचे घटक पक्षांमधले इतर नेते भाजप आणि शिवसेना यांच्यावर तुटून पडले असते, तर त्यांना कुठल्याही शहरात बिनविरोध नगरसेवक निवडून आणायचे “राजकीय चमत्कार” घडवता आले नसते.

– आदित्य आणि अमित ठाकरेंचा फक्त मुंबईसाठी कार्यक्रम

पण एकीकडे भाजप आणि शिवसेना घाऊक पद्धतीने आपले नगरसेवक बिनविरोध निवडून आणत असताना दुसरीकडे ठाकरे बंधूंनी मात्र फक्त मुंबईवर लक्ष केंद्रित करून आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा कार्यक्रम शिवसेना भवनात घेतला तिथे त्यांनी मुंबईकरांवर आश्वासनाची खैरात केली. घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये देऊ. 700 स्क्वेअर फुट पर्यंतच्या घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ करू, वगैरे घोषणाबाजी त्यांनी केली. पण इतर महापालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आपले नगरसेवक बिनविरोध निवडून आणत असताना संजय राऊत वगळता ठाकरे बंधूंनी किंवा महाविकास आघाडीच्या बाकीच्या नेत्यांनी चकार शब्द सुद्धा काढला नाही किंवा अन्य महापालिकांमध्ये आपल्या चिन्हांवर लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समर्थनासाठी ते जाहीरपणे उतरले नाहीत.

– भाजप – शिवसेनेला मोकळे रान

त्याचमुळे तर भाजप आणि शिवसेना यांना कल्याण डोंबिवली, ठाणे, पुणे, पनवेल, धुळे, जळगाव अशा शहरांमध्ये मोकळे रान मिळाले‌. तिथे ते नगरसेवक बिनविरोध निवडून आणायचा धुमाकूळ घालू शकले. हे रवींद्र चव्हाण किंवा एकनाथ शिंदे यांच्या यशापेक्षा ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे मोठे अपयश ठरले.

BJP Shivsena 25 corporators unapossed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात