‘’…त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या कर्तृत्वाचा विसर तुम्हाला पडला असावा.’’ असंही भाजपाने नेमाडेंना उद्देशून म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचं काल एक मोठं विधान समोर आलं. ‘’औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे नाव बदलणारे लोक क्षुद्र आहेत. यातून काहीच साध्य होणार नाही.’’ असं त्यांनी म्हटलं आहे. अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांच्या सह्याद्री देवराई संस्थेच्यावतीने देशी बियाणांद्वारे भालचंद्र नेमाडे यांची बीजतुला करण्यात आली. याप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते. त्यांच्या या विधानावर भाजपाने त्यांना आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं आहे. BJP responds to Bhalchandra Nemades criticism on Aurangabad Osmanabad name change
भाजपा महाराष्ट्रने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून भालचंद्र नेमाडेंच्या विधानाचा समाचार घेतल म्हटले की, “औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांची नावे बदलणारे लोक क्षुद्र आहेत. “असा शोध ज्ञानपीठ विजेते लेखक प्रा. भालचंद्र नेमाडे यांनी लावून समस्त मराठी जनांचा, मनाचा आणि त्यांच्या भावनांचा अपमान केला आहे. छत्रपती संभाजीनगर हे केवळ नाव नसून आमच्यासाठी श्वास आहे.’’
याचबरोबर ‘’धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे उपकार सात जन्मातही विसरता येणार नाहीत. त्यांचे शौर्य अलौकिक आहे. पण नेमाडे, हे सगळे तुम्ही विसरले! बरोबरच आहे, तुम्ही इंग्रजीचे प्रोफेसर. “नावात काय आहे?” या शेक्सपीअरच्या प्रश्नाचे लोणचे घालण्यात तुम्ही हयात घालवली. त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या कर्तृत्वाचा विसर तुम्हाला पडला असावा. अफाट मुघल सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे प्रतिभासंपन्न छत्रपती संभाजी महाराज उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकार होते. संभाजी महाराजांनी ‘बुधभूषण’ हा संस्कृत, तर ‘नायिकाभेद’, ‘नखशीख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. ते नेमाडेजींनी वाचले असते तर साहित्यिक म्हणून छत्रपती संभाजी महाराज आपल्यापेक्षा श्रेष्ठ होते, हे दिसले असते.’’ असंही भाजपाने म्हटलं आहे.
"औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांची नावे बदलणारे लोक क्षुद्र आहेत. "असा शोधज्ञानपीठ विजेते लेखक प्रा. भालचंद्र नेमाडे यांनी लावून समस्त मराठी जनांचा, मनाचा आणि त्यांच्या भावनांचा अपमान केला आहे. छत्रपती संभाजीनगर हे केवळ नाव नसून आमच्यासाठी श्वास आहे.(1/6) — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 25, 2023
"औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांची नावे बदलणारे लोक क्षुद्र आहेत. "असा शोधज्ञानपीठ विजेते लेखक प्रा. भालचंद्र नेमाडे यांनी लावून समस्त मराठी जनांचा, मनाचा आणि त्यांच्या भावनांचा अपमान केला आहे. छत्रपती संभाजीनगर हे केवळ नाव नसून आमच्यासाठी श्वास आहे.(1/6)
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 25, 2023
याशिवाय, ‘’ केवळ “हिंदू” कादंबरी लिहून उपयोगाचे नाही. तुम्ही समृद्ध नव्हे, तर जाळी लागलेली ‘अडगळ ‘आहात हे सिद्धच केले. आयुष्याचा होम करणारी पिढी शिवरायांच्या या महाराष्ट्राने बघितली, तेंव्हा कुठे नामांतर झाले. हाही इतिहास वाचा जरा. नेमाडे, क्षुद्र कोणाला म्हणता? शिंदे-फडणवीस सरकारने नामांतराचा हा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्या घटनादत्त मंत्रिमंडळाला तुम्ही क्षुद्र म्हणाले. धर्मवीरांचा, मंत्रिमंडळाचा अपमान तुम्ही केला. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. माफी मागा, त्याशिवाय तरणोपाय नाही.’’ असं म्हणत भाजपाने नेमाडेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत माफी मागवी अशी मागणी केली आहे. यासोबतच #यादराखानेमाडे असं शेवटी जोडलं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App