‘’उद्धव ठाकरे मानसिकदृष्ट्या रूग्ण असल्याचा सर्वात मोठा पुरावा आज महाराष्ट्राला मिळाला’’ असंही म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कायमच भाजपा, शिंदे-फडणवीस सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करताना दिसतात. मात्र आज उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना, मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले. यामुळे भाजपा आक्रमक झाली असून उद्धव ठाकरेंच्या टीकेवर भाजपाकडून जोरदार पलटवारही करण्यात आला आहे. BJP responded to Uddhav Thackerays criticism of Devendra Fadnavis
उद्धव ठाकरे काल पाटण्यात जाऊन विरोधकांच्या बैठकीत सामील झाल्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर आता मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसले तर चालते का?, असा बोचरा सवाल केला होता. त्याचवेळी त्यांनी ही मोदी हटाव बैठक नसून परिवार बचाव बैठक असल्याची टीका केली होती. ज्यावरून आज उद्ध ठाकरे यांनी फडणवीसांवर, ‘’तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे व्हाट्सअप चॅट बाहेर आले तर तुम्हाला शवासनच करावे लागेल. दुसरे कोणते आसन तुम्हाला झेपणार नाही. केवळ शवासनावर झोपून राहावे लागेल. “योगा डे”.’’ अशा शब्दांत टीका केली.
यावर भाजपाने प्रत्युत्तर देताना म्हटले की, ‘’उद्धव ठाकरे यांनी आमचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज केलेली वैयक्तिक आणि घाणेरडी टीका ठाकरे यांचे मानसिक संतुलन आता पूर्णतः ढळले असल्याचे द्योतक आहे. काही दिवसांपासून ठाकरे यांच्या या वायफळ बडबडीमुळे त्यांच्या तब्येतीबद्दल अनेकांच्या मनात असंख्य शंका होत्या. पण ते आता मानसिकदृष्टया रुग्ण असल्याचा सर्वात मोठा पुरावा आज महाराष्ट्रातील जनतेला मिळाला आहे.’’
उद्धव ठाकरे यांनी आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्यावर आज केलेली वैयक्तिक आणि घाणेरडी टीका ठाकरे यांचे मानसिक संतुलन आता पूर्णतः ढळले असल्याचे द्योतक आहे. 1/5 — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 24, 2023
उद्धव ठाकरे यांनी आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्यावर आज केलेली वैयक्तिक आणि घाणेरडी टीका ठाकरे यांचे मानसिक संतुलन आता पूर्णतः ढळले असल्याचे द्योतक आहे. 1/5
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 24, 2023
याचबरोबर ‘’ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर देवेंद्र फडणवीस यांनी कधीही अशी टीका केली नाही. तो त्यांचा स्वभाव नाही. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी काय काय केले. या गोष्टी सांगितल्या तर पुढचे संपूर्ण आयुष्य ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना खाली मान घालून जगावे लागेल. उद्धव ठाकरे हे हवापालट करण्यासाठी मध्यंतरी परदेशात जाऊन आले. ते नेमके फिरायला गेले होते की मानसिक उपचारासाठी गेले होते? हा एक संशोधनाचा विषय आहे.’’ असंही भाजपाने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App