‘’थोडा अर्थसंकल्प नीट ऐकला असता, तर असलं लिहायचं धाडस झालं नसतं’’ असंही भाजपाने म्हटलं आहे.
प्रतिनिधी
शिंदे-फडणीस सरकारचा काल पहिला अर्थसंकल्प जाहीर झाला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला. पाच ध्येयांवर आधारित असणारा हा अर्थसंकल्प सर्वसमावेशी असल्याचे दिसून आले. मात्र विरोधकांकडून हा अर्थसंकल्प नुसता शब्दांचा फुलोरा, हवेचे बुडबुडे असल्याची टीका केली गेली. उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प गाजराचा हलवा असल्याचं म्हटलं, शिवाय आज सामनाच्या अग्रलेखातूनही यावर टीका केली गेली. या टीकेला भाजपाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. BJP responded to Uddhav Thackeray’s criticism on the budget
सरकारच्या स्थैर्याने अर्थसंकल्पात तरतुदींचा जोर; विरोधकांचा मात्र बैठकांवर भर!!
‘’आपल्या बुद्धीचा आणि बजेटचा दुरान्वये संबध नाही, उद्धव ठाकरे, बजेट तुमच्या बुद्धीच्या आवाक्या पलीकडचं आहे. आणि हो, घरगड्याला ‘गाजराचा हलवा’ वाटने साहजिकच आहे. घरगडी, घरात बसून गाजराचा हलवाच बनवत असतो. त्यामुळे, घरगड्याला प्रत्येक गोष्टीत गाजराचा हलवा दिसतो.’’ अशा शब्दांमध्ये भाजपाने उद्ध ठाकरेंना टोला लगावला आहे.
आपल्या बुद्धीचा आणि बजेटचा दुरान्वये संबध नाही, @OfficeofUT , बजेट तुमच्या बुद्धीच्या आवाक्या पलीकडचं आहे. आणी हो, घरगड्याला 'गाजराचा हलवा' वाटने साहजिकच आहे. घरगडी, घरात बसून गाजराचा हलवाच बनवत असतो. त्यामुळे, घरगड्याला प्रत्येक गोष्टीत गाजराचा हलवा दिसतो. pic.twitter.com/5AKciMnC5Y — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 10, 2023
आपल्या बुद्धीचा आणि बजेटचा दुरान्वये संबध नाही, @OfficeofUT , बजेट तुमच्या बुद्धीच्या आवाक्या पलीकडचं आहे.
आणी हो, घरगड्याला 'गाजराचा हलवा' वाटने साहजिकच आहे. घरगडी, घरात बसून गाजराचा हलवाच बनवत असतो. त्यामुळे, घरगड्याला प्रत्येक गोष्टीत गाजराचा हलवा दिसतो. pic.twitter.com/5AKciMnC5Y
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 10, 2023
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? –
“अर्थसंकल्पात सर्व समाजातील घटकांना मधाचं बोट लावण्याचं काम झालं आहे. त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झाला. अवकाळी पाऊस पडल्यावर मुंबईत गडगडात झाली, पण पाऊस पडला नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प ‘गरजेल तो बरसेल’ अशा परिस्थितीचा आहे. एका वाक्यात सांगायचं तर ‘गाजर हलवा’, असं अर्थसंकल्पाचं वर्णन करेल,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
तर, ‘’आपल्याला अर्थसंकल्पातील काहीच कळत नाही, अशी जाहीर कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली होती व अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच आपण प्रतिक्रिया देतो असेही ते म्हणाले होते. त्याचा आणखी एक पुरावा म्हणजे आजचा सामनाचा अग्रलेख. थोडा अर्थसंकल्प नीट ऐकला असता तर असलं लिहायचं धाडस झालं नसतं.’’ असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
आपल्याला अर्थसंकल्पातील काहीच कळत नाही अशी जाहिर कबुली @OfficeofUT यांनी दिली होती व अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच आपण प्रतिक्रिया देतो असेही ते म्हणाले होते. त्याचा आणखी एक पुरावा म्हणजे आजचा @SaamanaOnline चा अग्रलेख. थोड अर्थसंकल्प नीट ऐकला असता तर असल लिहायच धाडस झाल नसत. pic.twitter.com/zOMTEaPGoy — Keshav Upadhye (Modi Ka Pariwar) (@keshavupadhye) March 10, 2023
आपल्याला अर्थसंकल्पातील काहीच कळत नाही अशी जाहिर कबुली @OfficeofUT यांनी दिली होती व अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच आपण प्रतिक्रिया देतो असेही ते म्हणाले होते. त्याचा आणखी एक पुरावा म्हणजे आजचा @SaamanaOnline चा अग्रलेख. थोड अर्थसंकल्प नीट ऐकला असता तर असल लिहायच धाडस झाल नसत. pic.twitter.com/zOMTEaPGoy
— Keshav Upadhye (Modi Ka Pariwar) (@keshavupadhye) March 10, 2023
‘’देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे दुबळी माझी झोळी म्हणावा असाच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना छप्परफाड घोषणा केल्या. मात्र महाराष्ट्राची वास्तविक आर्थिक स्थिती जनतेच्या नजरेसमोर येऊ न देता स्वप्नाळू दुनियेची सैर घडवणारा हा अर्थसंकल्प आहे. सत्तेसाठी खोक्यांचा वापर करायचा आणि शेतकरी तसंच जनतेसाठी निवडणुकीच्या वर्षात घोषणांचा सुकाळ करत स्वप्ने दाखवायची हेच धोरण अर्थसंकल्पात समोर आलं. ’’असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर सामनातून टीका करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App