विशेष प्रतिनिधी
मुंबई : माध्यमांनी निवडणुकीच्या मैदानात “माधुरी” आणली पण भाजपनेती चर्चा फेटाळली!!, असे आज घडले.BJP rejects reports of madhuri dixit to contest loksabha elections
माधुरी दीक्षित लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आणि लोकसभा निवडणुकीत तिला तिकीट मिळणार अशी चर्चा माध्यमांनी त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने कालपासून सुरू केली. स्वतः माधुरी दीक्षित ती स्टोरी फेटाळली होती. पण तरीदेखील माध्यमांनी पुन्हा एकदा त्यांच्या सूत्रांच्याच हवाल्याने तशीच चर्चा पुन्हा सुरू केली. मात्र आता ही चर्चा भाजपने फेटाळली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात स्पष्ट सांगितले की, लोकसभा निवडणुकीतील सर्व उमेदवार भाजपचे पार्लमेंटरी बोर्ड ठरवत असते. त्यामुळे सध्या तरी माधुरी दीक्षित भाजपमधून निवडणूक लढण्याची पक्षांतर्गत कोणतीही चर्चा सुरू नाही.
माधुरी दीक्षितच्या आधी कंगना राणावत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा त्याच पद्धतीनेच माध्यमांनी सुरू केली होती. पण त्यासाठी कंगनानेच केलेल्या वक्तव्याचा त्याला आधार होता. द्वारकेत श्रीकृष्ण मंदिराला भेट दिल्यानंतर तिने पत्रकारांना तसे सांगितले होते. त्यामुळे कंगना रावणा राणावत मुंबईतून भाजपच्या तिकिटावर निवडणुकीत उतरणार की तिचे गृहराज्य हिमाचल मधून निवडणूक लढवणार??, याविषयी चर्चा माध्यमांनी सुरू केली होती. आता त्याच पद्धतीने माधुरी दीक्षित पण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा माध्यमांनी सुरू केली. परंतु सध्या ती चर्चा भाजपने फेटाळली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App