पुण्यातल्या कोरेगाव पार्क/ कोंढवा मधल्या महार वतनाच्या 40 एकर जमिनीचा खरेदी गैरव्यवहार अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याच्यावर राजकीय दृष्ट्या उलटल्यानंतर अजितदादांवर मुंबईतून कोण game करतोय का??, असा सवाल करणाऱ्या बातम्या पवार बुद्धीच्या माध्यमांनी पेरल्यात. पण प्रत्यक्षात अजितदादांनी काँग्रेसच्या बाबतीत जे केले, तेच त्यांच्यावर भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून उलटले!!, असेच खरंतर राजकीय चित्र उमटले आहे, पण “पवार बुद्धीच्या” माध्यमांनी ते समोर आणायचे धाडस दाखविलेले नाही. Ajit Pawar
1800 कोटी रुपये किमतीची जमीन पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने 300 कोटी रुपयांना विकत घेतली. मुळात महार वतनाची जमीन विकता येत नाही. तिच्यावर शासनाचा शिक्का लागला असला तरी ती शासकीय जमीन होते. ती सुद्धा अशी खासगी कंपनीला विकता येत नाही. तरीदेखील आयटी पार्क उभारण्याच्या निमित्ताने पार्थ पवारांनी तो व्यवहार केला. अजितदादांचा राजकीय प्रभाव वापरून त्या गैरव्यवहाराचे धागेदोरे आपल्यापर्यंत येणार नाहीत, हे देखील पाहिले. बाकीच्या आठ आरोपींच्या विरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले तरी अजून पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला नाही. किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या जमिनीचा व्यवहार अजून रद्द केलेला नाही. स्वतः अजित पवारांनी या सगळ्या व्यवहारावरून कानावर हात ठेवले आपल्याला संशयाला तेव्हा हा व्यवहार करू नका आपण असे सांगितले होते, असा दावा अजित पवारांनी केला. पण व्यवहारातले सगळे काळेबेरे बाहेर आल्यानंतर सुद्धा अजित पवारांनी अजून राजीनामा दिला नाही किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांना बाहेरचा रस्ता दाखविलेला नाही. तरीदेखील “पवार बुद्धीच्या” माध्यमांनी अजित पवार यांच्या विरोधात मुंबईतून game होत असल्याच्या बातम्या पेरल्या. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची राजकीय फोडणी दिली. Ajit Pawar
अजित पवारांच्या काँग्रेस विरोधात कारवाया
अजित पवारांनी काँग्रेसबरोबर सत्तेवर असताना पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिका काँग्रेसचा पराभव करून जिंकल्या त्यांनी पुण्यामध्ये सुरेश कलमाडींचे नेतृत्व निष्प्रभ केले त्यासाठी त्यांनी काँग्रेस – राष्ट्रवादी सरकारमध्ये पुणे महापालिकेचा भौगोलिक विस्तार घडवून आणला. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असणारी गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करून घेतली. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसची नगरसेवकांची संख्या वाढवून पुणे महापालिकेत सुरेश कलमाडींचे नेतृत्व मानणारी काँग्रेस सत्तेवरून पायउतार केली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेवर कब्जा केला. काँग्रेस पक्ष पोखरून अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये सत्ता काबीज केली. पुणे जिल्हा परिषदेवर वर्चस्व कायम ठेवले. अजित पवारांनी काँग्रेस बरोबरच सत्तेवर राहून पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातली काँग्रेस एकतर संपविली किंवा काँग्रेस पक्षाचे नेते राष्ट्रवादीमध्ये घेऊन ते राजकीय दृष्ट्या पचवून टाकले.
अजितदादा भाजपला धक्का देण्यात अपयशी
पण भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन अजित पवारांना भाजपला “तसा” “धक्का” देता आला नाही. उलट भाजपनेच अजित पवारांना राजकीय दृष्ट्या “वठणीवर” आणले. अजित पवारांची सत्ता केंद्रे राहिलेल्या महापालिकांमध्ये अजित पवारांचा पराभव करून भाजपचा वर्चस्व निर्माण केला. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या नेत्यांनी फोडली. अजितदादांचा दोन्ही महापालिका मधला राजकीय प्रभाव कमी करत भाजपच्या राज्याच्या नेतृत्वाचा प्रभाव दोन्ही महापालिकांमध्ये निर्माण केला.
सोलापूर जिल्ह्यामध्ये अखंड राष्ट्रवादीचा नेहमी प्रभाव राहिला पण अजित पवारांना तो प्रभाव टिकवता आला नाही त्यांच्या सगळ्या माजी आमदारांना ते समाधानी करू शकले नाहीत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे माजी आमदार राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये येऊन दाखल झाले.
महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनवर अजित पवारांचे पूर्ण वर्चस्व राहिले परंतु भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आल्यानंतर अजित पवार आपले ते जुने वर्चस्व टिकवू शकले नाहीत. त्यांना भाजपबरोबर तडजोड करणे भाग पडले. मुरलीधर मोहोळ यांना ऑलिंपिक असोसिएशनवर उपाध्यक्ष म्हणून घेणे भाग पडले त्याचबरोबर भाजपशी तडजोड करून पुढच्या दोन वर्षांनी मुरलीधर मोहोळ यांची अध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी मान्यता द्यावी लागली. तरी देखील अजित पवारांचे विश्वासू नामदेव शिरगावकर यांच्यावर गुन्हा दाखल होणे थांबू शकले नाही. ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये गैरव्यवहार केल्याचा गुन्हा नामदेव शिरगावकर यांच्यावर दाखल झालाच.
दादागिरीला वेसण
त्या पाठोपाठ अजित पवारांचा पुत्र पार्थ पवारचा कोरेगाव पार्क / कोंढवा जमीन घोटाळा समोर आला. महार वतनाची सरकारी टायटल लागलेली 1800 कोटी रुपये किमतीची जमीन पार्थ पवारने 300 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांच्या मूळावर आला. अजित पवार काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार असताना असे वागायचे तसेच वागायला गेले आणि अडचणीत सापडले. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना संभाळून घेतले. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याची ताबडतोब चौकशी लावली. त्यामुळे अजित पवारांचा राजीनामा हा विषय ऐरणीवर आला. अजित पवारांच्या राजकीय प्रभावाला भाजपने मोठा धक्का दिला. काँग्रेस – राष्ट्रवादी सरकार मध्ये चालणारी अजितदादांची “दादागिरी” भाजप सरकारमध्ये चालू शकली नाही. भाजपच्या नेत्यांनी अजितदादांच्या “दादागिरीला” व्यवस्थित वेसण घातल्याचे बोलले गेले. वास्तविक अजितदादांनी काँग्रेसच्या बाबतीमध्ये जे पोखरणारे राजकारण केले, तेच राजकारण अजित पवारांवर भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून उलटले. मात्र “पवार बुद्धीच्या” माध्यमांनी त्याला अजित पवारांच्या विरोधातले “कट कारस्थान” अशा स्वरूपाने रंगविले.
अर्थात भाजपने अजून अजितदादांच्या “दादागिरीला” पुरती “वेसण” घातली असे म्हणण्यासारखी स्थिती अजून तरी आलेली नाही. अन्यथा ज्या पद्धतीने जैन होस्टेलचा 230 कोटींचा व्यवहार भाजपच्या नेतृत्वाने झपाट्याने रद्द केला, तसा 300 कोटींचा कोरेगाव पार्क / कोंढवा जमिनीचा व्यवहार सुद्धा रद्द केला असता, पण तो अजून रद्द केलेला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App