प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांशी चर्चा करूनच अजितदादा माझ्यासोबत आले होते. मात्र त्यांना नंतर तोंडघशी पाडण्यात आले, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीच्या या मुलाखतीत केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात कसे साटे-लोटे झाले याचे सविस्तर वर्णन देखील या मुलाखतीत केले आहे. BJP – NCP government was formed after a consultations with sharad Pawar, but ajit Pawar was betrayed, says devendra Fadanavis
पहाटेच्या शपथविधी संदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, की शरद पवारांशी चर्चा करूनच भाजप – राष्ट्रवादी सरकार स्थापनेचा निर्णय झाला होता. अजितदादाही प्रामाणिकपणे माझ्यासोबत आले होते. त्यांनी शपथ घेतली होती. पण नंतर त्यांना तोंडघशी पाडण्यात आले. पहाटेच्या शपथविधी संदर्भात त्यांनी टीव्ही नाईन च्या मुलाखतीत काही प्रश्नांना नो कमेंट अशा उत्तर दिले आहेत त्यांनी सुरुवातीला कमेंट करू द्या मग मी त्यावर सविस्तर उत्तर देईन असे आश्वासन देखील फडणवीस यांनी देऊन पुढचा सस्पेन्स आपण फोडू, असा इशाराही देऊन ठेवला आहे. महाविकास आघाडी बनवण्याच्या आधी
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात साटे – लोटे झाले होते. शिवसेनेने भाजपच्या जागा कमी कराव्यात आणि आघाडीत काँग्रेसच्या जागांना राष्ट्रवादीने धक्का द्यावा, असे ठाकरे – पवारांमध्ये ठरले होते. त्यामुळे आपापला स्टेक युती आणि आघाड्यांमध्ये वाढू शकेल, असे त्यांना वाटले होते. ते कदाचित शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना समजावले असेल. पण त्यानंतर मात्र शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करतील अशी आकड्याची शक्यता निर्माण झाल्यावर उद्धव ठाकरे यांच्या मनात मुख्यमंत्रीपद शिरले आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकले, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे.
Devendra Fadanavis : बदली घोटाळ्यात अनिल देशमुख जेलमध्ये; फडणवीसांना मुंबई पोलिसांची नोटीस; ते देणार उत्तर!!
उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर कितीही नॅरेटिव्ह तयार करत असले तरी कोणत्याही वेळी उद्धव ठाकरेंना भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले नव्हते, अशी स्पष्ट ग्वाही देखील फडणवीस यांनी या मुलाखतीत दिली.
शिंदे – फडणवीस सरकार स्थापनेबाबत देखील फडणवीस यांनी या मुलाखतीत सविस्तर भाष्य केले. गटनेताच जेव्हा तीन चतुर्थांश पक्ष घेऊन बाहेर पडतो, त्यावेळी भाजप सारखा पक्ष केवळ भजन करत बसेल का?? भाजपने ती संधी नेमकी घेतली याची आठवण फडणवीस यांनी करून दिली. 20 जूनला एकनाथ शिंदे यांच्या समवेत 29 आमदार सुरतला गेले होते आणि 25 तारखेपर्यंत 40 आमदार त्यांच्यासोबत आले. त्याचवेळी अपक्षांची ही जुळवाजुळव झाली. त्यामुळे सरकार स्थापनेत कोणताही अडथळा शिल्लक राहिला नव्हता, अशी क्रोनोलॉजी देखील फडणवीस यांनी या मुलाखतीतून स्पष्ट केली आहे.
उद्धव ठाकरे जरी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर राजकीय दृष्ट्या जगत असले तरी बाळासाहेबांनी हिंदुत्वाशी कधीही तडजोड केली नाही, हे ते विसरले. राम मंदिर, 370 कलम काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर यासारखे हिंदुत्वाचे विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी अग्रक्रमाने पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे हिंदुत्वाचा मुद्दा उरलेला नाही. जे कॅलेंडर छापून त्यावर जनाब बाळासाहेब ठाकरे असे लिहितात त्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकारच नाही, असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App