प्रतिनिधी
मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, गुरुवारी सकाळी त्यांनी दादर येथील सावरकर सदनास भेट दिली. सावरकरांशी संबंधित अनेक गोष्टींची यावेळी त्यांनी माहिती घेतली.BJP National President J. P. Nadda’s visit to Savarkar Sadan; Communication with Savarkar family
https://twitter.com/ShelarAshish/status/1659077965588877318?s=20
नड्डा यांनी सर्वप्रथम सावरकर सदनातील स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर वीर सावरकरांच्या सूनबाई सुंदर सावरकर यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. सावरकरांशी संबंधित वस्तू, मानपत्रे आणि साहित्याचा अनमोल ठेवा त्यांनी आस्थेने पाहिला, त्याबद्दल माहिती घेतली. स्वातंत्र्यवीरांचा दिनक्रम, त्यांच्या कामकाजाची पद्धत याविषयी वीर सावरकर यांची नात असिलता सावरकर – राजे यांनी नड्डांना माहिती दिली. सावरकरांचे वास्तव्य असलेल्या खोलीची पाहणी यावेळी त्यांनी केली.
यावेळी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माहिम विधानसभा प्रमुख अक्षता तेंडुलकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतल्यानंतर सावरकर सदनाला भेट देत सावरकर स्मृतींना अभिवादन करून नड्डा यांनी आपल्या दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्याची सुरुवात केली. सकाळी १०.४५ वाजता त्यांनी रवींद्र नाट्य कौशल्य विकास कार्यक्रमाला हजेरी लावली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App