BJP MLA Prasad Lad : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल झालेल्या अटकेनंतर रात्रीच जामीनही मिळाला आहे. परंतु यानंतर राणेंच्या सतत सोबत असणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमक्यांचे फोन सुरू झाले. खुद्द लाड यांनीच माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. BJP MLA Prasad Lad Received Threat Calls after Narayan Rane Bail
विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल झालेल्या अटकेनंतर रात्रीच जामीनही मिळाला आहे. परंतु यानंतर राणेंच्या सतत सोबत असणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमक्यांचे फोन सुरू झाले. खुद्द लाड यांनीच माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
नारायण राणेंना जेल ते बेल या सगळ्या घडामोडीदरम्यान भाजप आ. प्रसाद लाड हे त्यांच्यासोबतच होते. पोलिसांनी भरल्या ताटावरून नारायण राणेंना उचलून नेलं असा आरोप करत प्रसाद लाड यांनी एक व्हिडिओसुद्धा ट्वीट केला होता. रात्री उशिरा राणेंना जामीन मिळाल्यावर राणे महाडहून मुंबईला निघाले तेव्हा लाड यांना धमकीचे फोन सुरू झाले.
प्रसाद लाड म्हणाले की, “रात्री 2 वाजून 51 मिनिटांपासून मला धमकीचे फोन सुरू झाले, जे अजूनही सुरू आहेत. मला एक नाही, तर धमकीचे अनेक फोन आले आहेत. अज्ञात नंबरवरून हे फोन येत आहेत. फोनमधील व्यक्ती अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मला जिवे मारण्याची धमकी देत आहेत. वाईट पद्धतीने मेसेज टाकत आहे.”
लाड म्हणाले की, “मी आताच सायन पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसोबत बोललो. त्यांना पत्र लिहिलं आहे. तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांनाही याविषयी मी पत्र लिहिणार आहे आणि हा सगळा विषय त्यांना अवगत करणार आहे.”
लाड यांनी आरोप केलाय की, “काही दिवसांपूर्वी सचिन वाझेकरवी सुपारी होती. सचिन वाझेकडे अग्रवाल नावाच्या व्यक्तीने तशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं होतं. त्यामुळे माझ्या जिवाला सातत्याने धोका वाढतोय. पण अशा धमक्यांना मी एक तरुण म्हणून, मराठी आमदार म्हणून भीक घालत नाही. अशा धमक्यांना मी जशास तसं उत्तर देईन”, असंही ते म्हणाले.
BJP MLA Prasad Lad Received Threat Calls after Narayan Rane Bail
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App