मराठा समाजाच्या माझ्या बांधवानी हा डाव वेळीच ओळखावा.. हीच विनंती ! असं आवाहनही केलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : जालना जिल्ह्यातील अंबड येथे काल मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर राज्यातील राजकारण हळूहळू तापताना दिसत आहे. आंदोलकांनी सुरुवातील पोलिसांवर दगडफेक केल्यानतंर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला असल्याचं गृहमंत्री फडणवीसांनी सांगतिलं आहे. तसेच याप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासनही दिलं गेलं आहे. मात्र तरीही या घटनेला आता काही जणांकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. BJP MLA Nitshe Rane criticizes Mahavikas Aghadi
नितेश राणे म्हणतात, ”मराठा आरक्षण हे राणे समितीच्या अहवाला मुळे भेटलं.. आणि ते आरक्षण फडणवीसांनी टिकवून दाखवलं.. पण विरोधकांना मराठा आरक्षणाबद्दल काही देणंघेणं नाही.. सत्तेत असताना यांनी आरक्षणाच्या केसची वाट लावली.. समाजाला ही माहीत आहे, आरक्षण परत आमचेच सरकार देणार.. शांत आंदोलन होत असताना पोलिसांवर दगड कोणी मारायला लावली? माविआच्या नेत्यांची खरी चिंता मराठा आरक्षण पेक्षा राज्यात निघणाऱ्या “हिंदू जनआक्रोश मोर्चाची” आहे.. हिंदू समाजाला आपसात लढवत ठेवायचे!! मराठा समाजाच्या माझ्या बांधवानी हा डाव वेळीच ओळखावा.. हीच विनंती !”
याचबरोबर छत्रपती संभाजीनगरात काल वाहनांची जाळपोळ झाली, यावर नितशे राणेंनी म्हटले की, ”काल रात्री छत्रपती संभाजीनगरला कुठल्या उबाठा नेत्याच्या जवळच्या लोकांनी गाड्या जाळल्या ?? उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सतत राज्यात दंगली होणार हे सांगत होते.. मग हीच ती दंगल होती का? यांची चौकशी झाली पाहीजे !!”
याशिवाय ”प्रत्येक जिल्ह्यात आणि गावागावात निघणारे हिंदू मोर्चे हे काँग्रेस आणि विरोधकांचे खरे दुखणे आहे.. लव जिहाद, लँड जिहाद सारखे मुद्दे यांना अडचणीचे आहेत.. कारण हे ज्या जिहादी लोकांना पोसतात तेच अडचणीच यायला लागले आहे.. हिंदू सामाज जागा होतो आहे आणि ते यांना परवडणारे नाही.. म्हणुन हिंदू समाजाला जाती-जाती मध्ये झुंजवत ठेवायचे आणि आपल्या जिहादी बापांना खुश ठेवायचे हाच खरा कार्यक्रम आहे !!” अशी टीकाही नितेश राणेंनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App