पुण्यात मेट्रोचे उद्घाटनही झाले, पण मुंबईत बेबी पेंग्विन अजून जागा शोधताहेत, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

प्रतिनिधी

मुंबई – पुण्यात थोड्याच वर्षांत मेट्रोचे काम होऊन आज उद्घाटन देखील झाले. पण आमच्या इकडे मुंबईत बेबी पेंग्विन अजून जागा शोधताहेत… कुठे गार लागतेय… कांजूरमार्गला की आरेला, अशा शब्दांत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज नाव न घेता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची आज खिल्ली उडविली.BJP MLA nitesh rane targets aditya thackeray over metro issue in mumbai

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मुंबई आणि पुण्यात एकदम मेट्रोच्या कामासाठी मंजूरी दिली. पुण्यात भाजपची सत्ता असल्याने वेगात काम झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात मेट्रोचे उद्घाटन देखील केले. पण मुंबईत मेट्रोचे काम अडविल्यावरून नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.



ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात मेट्रोचे उद्घाटन केले. देवेंद्र फडणवीसांनी मुंबई आणि पुण्यात मेट्रोचे काम केले होते. पुण्यात भाजपची सत्ता असल्याने मेट्रोचे काम देखील झाले. पण इकडे मुंबईत अजून बेबी पेंग्विन अजून जागाच शोधताहेत. कुठे थंड वाटतेय ते. कांजूरमार्गला गार लागतेय की आरेला गार लागतेय… सोच के बताएंगे, अशी आदित्य ठाकरे यांच्या बोलण्याची नक्कल करीत नितेश राणे यांनी टोला हाणला.

-राष्ट्रवादीला चप्पलफेकीवरून इशारा

पिंपरी चिंचवडमध्ये शाहू नगरच्या अटल बिहारी वाजयेपी उद्यानाच्या उद्घाटनाला जाताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीच्या दिशेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चप्पल फेक करण्याचा प्रकार केला.

या चप्पलफेकीवरून देवेंद्र फडणवीस यांनी असले फालतू कोणी तरी असतात, असे प्रत्युत्तर दिले. मात्र, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीला जोरदार इशारा दिला आहे.

भाजपच्या नेत्यांवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जर चप्पल फेक करणार असतील, तर भाजपचे कार्यकर्तेही गप्प बसणार नाहीत. राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात फिरत असतात. तेव्हा त्यांना देखील चपलांच्या माळा घातल्याशिवाय भाजपचे कार्यकर्ते राहणार नाहीत. जरा २४ तासांसाठी पोलीसांना सुट्टी द्या मग बघू. आम्ही त्यांना चपलांच्या माळा घालू. त्यांनी चपला मोजत बसाव्यात, असा इशारा नितेश राणे यांनी मुंबईत बोलताना दिला.

BJP MLA nitesh rane targets aditya thackeray over metro issue in mumbai

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात