विशेष प्रतिनिधी
मुंबई : खोटे आरोप केल्याचे म्हणत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर 50 कोटींचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. पडळकर यांनी मात्र असल्या दाव्यांना आपण घाबरत नसल्याचं म्हटलं आहे. माझ्यावर खुशाल 50 कोटींचा दावा करा. मी असल्या गोष्टींना घाबरत नाही. माझे मायबाप खंडोबा आणि बिरोबा आहेत, अस आव्हान गोपीचंद पडळकर यांनी दिलं आहे.BJP MLA Gopichand Padalkar Criticizes Congress MLA And Minister Vijay Wadettiwar Watch V
माझ्यावर ५० कोटींचा दावा वडेट्टीवारांनी खुशाल टाकावा,मी कशालाही घाबरत नाही, कारण माझी माय आणि माझा बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा व आरेवाडीचा बिरोबा आहे.#जय_मल्हार@VijayWadettiwar @INCMaharashtra pic.twitter.com/6JeTERQg1U — Gopichand Padalkar (Modi Ka Parivar) (@GopichandP_MLC) September 7, 2021
माझ्यावर ५० कोटींचा दावा वडेट्टीवारांनी खुशाल टाकावा,मी कशालाही घाबरत नाही, कारण माझी माय आणि माझा बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा व आरेवाडीचा बिरोबा आहे.#जय_मल्हार@VijayWadettiwar @INCMaharashtra pic.twitter.com/6JeTERQg1U
— Gopichand Padalkar (Modi Ka Parivar) (@GopichandP_MLC) September 7, 2021
पडळकर म्हणाले की, महाराष्ट्रातील ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या हक्काचे 125 कोटी रुपये यांना खर्च करता आले नाहीत. हे माझ्यावर 50 कोटींचा दावा करणार आहेत. खुशाल करा, मी असल्या गोष्टींना घाबरत नाही. कारण माझी माय आणि माझा बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा व आरेवाडीचा बिरोबा आहे.
काँग्रेस नेते व मंत्री वडेट्टीवार यांनी काल पडळकरांचे सर्व आरोप फेटाळत म्हटले होते की, पडळकरांनी ऐकीव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर आरोप करावेत. आता ते कार्यकर्ते राहिलेले नाहीत. आमदार झाले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत.
माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. कोणत्या नातेवाईकाची आहे हे सांगावं. नाही सांगितलं तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन. कोर्टात जाईन.
माझी कोणत्याही दुकानात भागिदारी नाही. असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करावी, असं वडेट्टीवार म्हणाले. पडळकर खऱ्या बापाची औलाद असेल तर, तर त्यांनी आरोप सिद्ध करावे, असही ते म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App