भाजप आमदार गीता जैन यांचा रुद्रावतार, लोकांची घरे तोडण्यासाठी आलेल्या मनपा अभियंत्याला कॉलर धरून श्रीमुखात भडकावली

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मीरा-भाईंदर येथील महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास आमदार गीता जैन यांनी चक्क कॉलर धरत कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.BJP MLA Geeta Jain’s Rudravatar was provoked in Srimukh by holding the collar of municipal engineer who came to demolish people’s houses

काही घरांवर कारवाई करण्यासाठी पथक पाठवले होते. त्या पथकात मनपाचे अभियंताही सहभागी होते. यामुळे संतपालेल्या आमदार गीता जैन यांनी त्यांची कानउघडणी करत त्याच्या श्रीमुखात भडकवली आहे.



नेमके काय आहे प्रकरण?

आमदार गीता जैन यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या ठेक्यावरील कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांची कॉलर धरून कानशीलात लगावली. येथील परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या राहत्या घरावर कारवाई करण्यासाठी या अभियंत्यांच्या नेतृत्त्वात पथक गेले होते. त्यामुळे, पीडित कुटुंबाने आमदार गीता जैन यांच्याकडे धाव घेतली होती. त्यावेळी, आमदार जैन यांनी अभियंत्यास सरकारी नियम आणि माणुसकीचा दाखला देत समज दिली. त्या घरात लहान मुले आहेत, कुटुंब राहत आहे, आणि तुम्ही घर तोडायचे काम करता, तुम्ही माणसे आहात की राक्षस? असा सवाल आमदार जैन यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

आमदारांना राग अनावर

आमदार बोलत असताना मनपाचे अभियंता शुभम पाटील हे हसत असल्याने आमदार गीत जैन यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांना राग अनावर झाल्याने त्यांनी थेट कॉलर धरत त्यांच्या थेट श्रीमुखात लगावली. दरम्यान, पावसाळ्यात राहती अनधिकृत घरे तोडू नयेत, असे शासन आदेश आहेत, असेही त्यांनी यावेळी मनपा अधिकाऱ्यांना सांगितले.

BJP MLA Geeta Jain’s Rudravatar was provoked in Srimukh by holding the collar of municipal engineer who came to demolish people’s houses

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात