‘’चाहे तों शामियाना लगाने का हमं करते है खर्चा, आता होऊन जाऊ दे चर्चा’’ आशिष शेलारांचं उद्धव ठाकरेंना आव्हान!

Uddjav Thakrey and Shelar

‘’मुंबईकरांच्या अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागणार’’ असंही शेलारांनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपा आमदार आशिष शेलार यांनी  ठाकरे गटाचे  प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. मुंबईशी निगडीत समस्यांवरून प्रश्न विचारात आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना त्यांची संजय राऊतांकडून घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीवर टीका केली आहे.  BJP MLA Ashish Shelars commentary on Uddhav Thackerays response to various problems in Mumbai

आशिष शेलार म्हणतात, ‘’मुंबईला काय घातक आहे?, मुंबई महापालिका निवडणुका कोण कोर्टात गेल्यामुळे रखडल्यात?, मुंबईला कुणी किती वर्षे लुटली?, मुंबईतून काय बाहेर गेलं आणि काय आलं?, क्रिकेटचं महत्त्व मुंबईतून खरंच संपतंय का?, सामने मुंबई बाहेर खरंच जाणार का? मुंबईकरांच्या अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागणार!’’

याशिवाय, ‘’घरबसल्या मुलाखत देण्यापेक्षा चला तर मग…सोडा अहंकार… व्हा दिलदार…टोमणे मारणे सोडा..चाहे तों शामियाना लगाने का हमं करते है खर्चा आता होऊन जाऊ दे चर्चा!!’’ असं म्हणत  आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना एकप्रकारे आव्हान दिलं आहे.

या अगोदरही आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.  ‘’महाराष्ट्राच्या जनमताशी ज्यांनी बेईमानी केली ते इमानदार कसे? कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीचे पुसणार नाहीत आता ते ठसे!  ही कसली मुलाखत…ही तर जळजळ, मळमळ आणि अपचनाचे करपट ढेकर स्वतः चा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या “कलंका”तून बाहेर पडण्याची धडपड!! भरलेला डालड्याचा डाबा उपयोगाला तरी येतो रिकामा डबा टमरेल ठरतो! एक काळ मुलाखतीतून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे डागायचे ते असायचे काडतुस हल्ली सगळं फडतूस, फडतूस आणि फडतूस!!!’’  असं शेलार म्हणाले आहेत.

BJP MLA Ashish Shelars commentary on Uddhav Thackerays response to various problems in Mumbai

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub