‘’संजय राऊत हे वैफल्यग्रस्त, निराश व मानसिक तणावाखाली असल्याने ते…’’ आशिष शेलारांचे टीकास्त्र!

sanjay raut and shelar

‘’… त्यावेळी शिव्या आणि गुद्द्यांची भाषा बोलली जाते.’’ असंही शेलार म्हणाले आहेत.

प्रतिनिधी

मुंबई : भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात घडत असणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊतांकडून भाजपा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह निवडणूक आयोगाबाबत जी भाषा वापरली जात आहे, त्यावरून शेलार यांनी त्यांना टोला लगावला आहे. BJP MLA Ashish Shelar MP criticizes Sanjay Raut

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले, ‘’ज्यांकडे नैराश्य आहे, वैफल्य आहे आणि ज्यांना आपली बाजू मांडण्यात तर्क कमी पडतात. संवाद कमी पडतो, त्यासाठी उभी करणारी आपली बाजू कमी पडते, शब्द कमी पडतात. त्यावेळी शिव्या आणि गुद्द्यांची भाषा बोलली जाते.’’


Old Pension : १७ वर्ष जे सत्तेत होते ते ५ वर्षवाल्यांना विचारत आहेत – फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा!


याशिवाय, ‘’ज्या पद्धतींचं सातत्याने वक्तव्य संजय राऊत करतात, याचा अर्थ ते नैराश्यात आहेत. ते वैफल्यग्रस्त आहेत, ते मानसिक तणावात आहेत. त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी उचित शब्द मिळत नाहीत. त्यांची बाजू योग्य नाही, म्हणून ते शिव्यांचा वापर करत आहेत.’’ असंही शेलार म्हणाले.

याचबरोबर ‘’मी सदनामध्ये सुद्धा ज्या निवडणूक आयोगाने घोषित केलं म्हणून आम्ही आमदार झालो. त्या निवडणूक आयोगाला सुद्धा अपशब्द आणि शिवीगाळ करणं, याबद्दलची माहिती सभागृह अध्यक्षांनी नोंद करावी, त्यावर उचित विचार करावा, कार्यवाही करावी अशी मागणी मांडली. मी हेही मांडलं की अशा पद्धतीने व्यवस्थांवर प्रश्न उपस्थित करून शिवीगाळ करत सामान्य जनतेला उत्तेजित करून व्यवस्थेच्या विरोधात भडकवणे, हा एक गुन्हा होऊ शकतो याचाही विचार करावा.’’ अशी माहिती शेलार यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

BJP MLA Ashish Shelar MP criticizes Sanjay Raut

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात