भाजपा आमदार आशिष शेलारांचे ठाकरे गटावर टीकास्त्र, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. याला कारण, सिनेट निवडणुकीसाठीच्या मतदार नोंदणीतील घोटाळ्याबाबत चौकाशी समितीच्या अहवालातीलच घोटाळा असल्याचे समोर आली आहे.BJP MLA Ashish Shelar criticizes Thackeray group
आशिष शेलार म्हणाले आहेत की, ”सिनेट निवडणूक मतदार नोंदणीत उबाठा सेनेने केलेल्या घोटाळ्यावर अखेर चौकशी समितीने दिलेल्या अहवालात घोटाळा झाल्याचे शिक्कामोर्तब केले. पुन्हा मतदार यादी तयार करा असे निर्देश विद्यापीठाला दिले.”
याचबरोबर, ”यातून आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली की, हे सगळे प्रकरण गंभीर आहे. एक आर्थिक घोटाळाही यामध्ये करण्यात आला आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारची माहिती नसताना, एकाच नंबर वरुन, एकाच बँक खात्यावरून नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे. तेही विद्यापीठाच्या खात्यावर जमा न होता, ते कंत्राटदाराच्या खात्यात पैसे गेले आहेत.” असंही शेलारांनी म्हटलं आहे.
याशिवाय, ”आम्ही त्याचेही पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा व सोबत या आर्थिक घोटाळ्यांचीही आयकर खात्यामार्फत सरकारने चौकशी करावी. उबाठाच्या घोटाळेबाजांचा अर्धा चेहरा उघड झाला, त्यांचा पुर्ण चेहरा उघड व्हावा! हे कसले वाघ हे तर महापालिके पासून विद्यापीठापर्यंत सर्वत्र घोटाळेबाज!!” अशा शब्दांमध्ये आशिष शेलारांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App