इतरांच्या घरात घुसण्याची भाषा करता, संजय राऊत, तुमची घरातली किंमत खलिता वाहणाऱ्या काशिदाची!!; आमदार अमित साटमांचा हल्लाबोल

प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या तपासा संदर्भात आज राजकीय खळबळ उडवून दिली आहे. त्याच वेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना, आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही, अशी धमकी दिली आहे. संजय राऊत यांचा या धमकी मभरल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकीय रणकंदन पेटले असून भाजपचे आमदार अमित साटम यांनी संजय राऊत यांना परखड शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.BJP mla amit satan targets shiv sena mp sanjay raut

कालपर्यंत सोज्वळ भाषेत संजय राऊतांना उत्तर देणारे भाजपची नेते मंडळी आता मनगटाची भाषा करून शिवसेनेच्या भाषेतच उत्तर देऊ लागले आहेत. यामध्ये आता आमदार अमित साटम यांची भर पडली आहे.

आमित साटम म्हणाले, की जनाब संजय राऊत मुंबई ही तुमची जहागिरी नाही. इतरांच्या घरात घुसायची भाषा करता पण स्वत:च्या घरात तुमची किती किंमत आहे हे आम्हाला चांगले माहिती आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तुमची जागा फक्त खलिता वाहणाऱ्या काशिदाची आहे. भ्रष्टाचार करायचा आणि तो बाहेर काढला की किरीट सोमय्यांवर भेकड हल्ले करायचे, ही तुमची नियत आहे. आणि आता प्रवीण राऊत यांना अटक झाल्यामुळे साहजिकच तुमचे मानसिक संतुलन ढासळले आहे.

हुल्लडबाजी ही भाजपची संस्कृती नाही. पण तुमच्यासारख्यांना तुमच्याच भाषेत बोलायचे तर तुम्ही एकदा प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा, मग भाजप कार्यकर्त्यांच्या मनगटातली ताकद पहा. हे या मराठ्याचे तुम्हाला खुलेआव्हान आहे. जय जिजाऊ, जय शिवराय!!, अशा शब्दांमध्ये अमित साटम यांनी संजय राऊत यांना आव्हान दिले आहे.

BJP mla amit satan targets shiv sena mp sanjay raut

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात