नाशिक : नको बारामती, नको भानामती, अशा घोषणांची आठवण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या ऐन मोक्याच्या क्षणी आज काढण्यात आली. या घोषणांमधून पिंपरी चिंचवडकरांच्या मनातल्या पार्थ पवारच्या पराभवाच्या आठवणींना उजाळा द्यायची आयडिया भाजपच्या नेत्यांनी पुढे आणली.
2017 मध्ये भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करून पिंपरी चिंचवड महापालिका पहिल्यांदा जिंकली. त्यानंतर 2019 मध्ये अखंड राष्ट्रवादी असतानाच पार्थ पवारला लोकसभा निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय झाला. एकाच वेळेला सुप्रिया सुळे शरद पवार आणि पार्थ पवार असे तीन उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उभारल्याचे दिसून आले. परंतु, ते “वाईट” दिसेल म्हणून शरद पवारांनी माढा मतदारसंघातून माघार घेतली आणि पार्थ पवारला मावळ लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले.
– पार्थ पवारचा पराभव
पण एवढे होऊन सुद्धा मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवारचा पराभव झाला. त्यावेळी शरद पवारांनी स्थानिक उमेदवाराला डावलले म्हणून पिंपरी चिंचवडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकवला. शिवसेना – भाजप युतीने पवारांच्या घराण्यातल्या उमेदवाराचा पहिल्यांदा पराभव केला, अशी वातावरण निर्मिती भाजपने केली होती.
– पवार परिवाराला ठोकावा लागला तळ
2026 च्या महापालिका निवडणुकांमध्ये महेश लांडगे यांनी जोरदार शड्डू ठोकल्यामुळे सगळ्या पवार परिवाराला पिंपरी चिंचवड मध्ये येऊन तळ ठोकणे भाग पडले. रोहित पवार आणि सुनेत्रा पवार यांना प्रचारात ऍक्टिव्हेट होणे भाग पडले. अजित पवारांना तर पुणे आणि पिंपरी चिंचवड सोडून इतरत्र जाणे सुद्धा कठीण झाले त्यामुळे त्यांनी फक्त एकच दिवसात मराठवाडा आणि इतरत्र दौरा उरकून घेतला त्यानंतर ते पुन्हा पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच येऊन मुक्कामाला राहिले.
अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुद्धा काम दिले. त्यांना तर भोसरी मध्ये येऊन चार तास बैठका घ्याव्या लागल्या. एकट्या महेश लांडगे यांना घेरण्यासाठी सगळा परिवार पिंपरी चिंचवड मध्ये एकवटावा लागला.
– पवार परिवारावर जोरदार हल्लाबोल
पण भाजपच्या नेत्यांनी पवार परिवाराच्या एकजुटीवर जोरदार हल्लाबोल केला. महेश लांडगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड मध्ये आणले त्यांची आकुर्डी मध्ये जाहीर सहभाग घेतली आणि भोसरीत रोड शो करायला लावला. त्याचवेळी भाजपच्या पिंपरी चिंचवड मधल्या नेत्यांनी 2019 च्या पार्थ पवारच्या पराभवाच्या आठवणी जागवायला सुरुवात केली. नको बारामती, नको भानामती!! या घोषणा पुन्हा एकदा पिंपरी – चिंचवड मध्ये घुमवायला सुरुवात केली. एकेकाळी संऊपिंपरी चिंचवड वर एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या अजित पवारांना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पुरते जेरीला आणले. भाजपच्या राज्यस्तरावरच्या नेत्यांनी सुद्धा स्थानिक नेत्यांना व्यवस्थित बळ दिले. त्यामुळे पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा अजित पवारांची प्रतिमा स्थानिक नेतृत्वाने यावे आणि टपली मारून जावे!! अशी झाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App