पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजपची अजितदादांच्या राष्ट्रवादीशी नाही युती; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका या दोन महापालिकांमध्ये भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणार नाही. आम्ही दोन्ही पक्ष महायुतीत असलो, तरी आम्ही युती केली तर त्याचा फायदा दुसऱ्याला होईल. त्यामुळे आम्ही युती करून लढणार नाही. स्वतंत्रपणे लढू, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली.BJP has no alliance with Ajit’s NCP in Pune and Pimpri Chinchwad; Devendra Fadnavis clarifies

महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शहरांमध्ये राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली. त्याच्या पहिल्याच दिवशी आज देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वेगळ्या पद्धतीने दणका दिला. त्यांनी मुंबई सह सगळ्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी युती करून लढायचा निर्णय जाहीर केला. त्यात मुंबई आणि ठाण्याचा सुद्धा समावेश केला. पण पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करायचे टाळले.



पवार काका – पुतण्याचा मार्ग मोकळा

यामुळे अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी हे आतून किंवा बाहेरून एकत्र येण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याचबरोबर भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये महाविकास आघाडीतही राजकीय पाचर मारून ठेवली.

कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दोन्ही शहरांमध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवू श, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर केले होते त्यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करायची नाही, अशी भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मांडली होती. पण त्या भूमिकेला त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांनी छेद दिला होता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. तशी आघाडी झाली नाही, तर आपली डिपॉझिट सुद्धा वाचणार नाहीत, अशी भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या बाकीच्या नेत्यांनी मांडली होती.

– फडणवीस यांनी मारली पाचर

या राजकीय पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करणार नसल्याचे सांगून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी उघड किंवा छुपी आघाडी करण्याची मुभा देऊन टाकली, पण त्याचवेळी त्यांनी महाविकास आघाडी मध्ये पाचर मारून ठेवली. कारण दोन राष्ट्रवादी बाहेरून किंवा आतून एकत्र आल्या, तर पवार काका – पुतण्या काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्याशी जुळवून घेणार नाहीत. ते काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांना एकटे पडतील. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांना स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी लागेल. त्यामुळे भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करायचे टाळून पवार काका पुतणे आणि महाविकास आघाडी या दोघांनाही पेचात टाकून दिले.

BJP has no alliance with Ajit’s NCP in Pune and Pimpri Chinchwad; Devendra Fadnavis clarifies

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात