प्रतिनिधी
पुणे : Swargate rape case स्वारगेट एसटी स्थानकातील तरुणीवरील बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दत्तात्रय गाडे या आरोपीच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. प्रेमविवाह करून संसार थाटलेला असूनही, सात वर्षांचा मुलगा असतानाही, आरोपीने समलैंगिक संबंध ठेवून पैसे कमावले असल्याचा खुलासा पोलिस तपासात झाला आहे.Swargate rape case
आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी
दत्तात्रय गाडे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याने कोणतेही स्थिर काम केले नाही. त्यामुळे कुटुंबीयांशी त्याचे सतत वाद होत. त्याचा भाऊ शेती करत असताना, तो मात्र कोणतेही काम न करता भटकंती करत होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याने समलैंगिक संबंध ठेवून आर्थिक फायदा मिळवत असल्याचे पोलिस तपासात समोर आले.
पोलिसांचा तपास आणि आरोपीचा पलायनाचा प्रयत्न
घटनेच्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास स्वारगेट पोलिसांचे पथक त्याच्या घरी पोहोचले. मात्र, आरोपीच्या भावास ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच, गाडेला संशय आला आणि तो पसार झाला. पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने शोधमोहीम राबवली. गावातील तरुण, पोलिस पाटील आणि ग्रामस्थांच्या मदतीने ५-६ गावांमध्ये शोधमोहीम सुरू करण्यात आली.
आरोपीच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर
गाडे हा श्रीगोंदा, दौंड, स्वारगेट, अहिल्यानगर भागातील बसस्थानक व रेल्वेस्थानकांवर फिरल्याची माहिती मिळाल्याने संबंधित ठिकाणी शोधमोहीम राबवली. त्याच्या नातेवाईक आणि मित्रांची माहिती मिळवत, पोलिसांनी त्याचे संभाव्य ठिकाण शोधले. युवक काँग्रेसने लष्कर पोलिस चौकीसमोर आंदोलन करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
मोबाईल डेटाचा सखोल अभ्यास
पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलचे वर्षभराचे तांत्रिक विश्लेषण करून त्याच्या हालचालींचा मागोवा घेतला. पंढरपूर, उज्जैन, शिर्डी, शनिशिंगणापूर आदी ठिकाणी त्याने भेटी दिल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी विविध ठिकाणी शोध पथके पाठवण्याची तयारी केली.
असा हाती लागला पोलिसांच्या
गुनाट गावातील १००-१५० एकर ऊसशेतीमध्ये लपून राहिल्याने पोलिसांना त्याला शोधण्यात अडचण येत होती. त्याने ऊस आणि टोमॅटो खाऊन भूक भागवली. मात्र, तहान-भूक अधिक लागल्याने तो शेतीबाहेर पडला आणि ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. ही घटना समाजाला हादरवणारी असून, आरोपीच्या गुन्हेगारी वागणुकीमुळे त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी जनतेची मागणी आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App