खासदार रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी दाखल सर्व गुन्हे मागे, मुंबई पोलिसांनी दिली क्लीन चीट

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे (शिंदे गट) नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांकडून त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेने वायकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.Big relief to MP Ravindra Vaikar, all cases filed in Jogeshwari plot scam dropped, Mumbai police gave clean cheat



जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी दाखल होता गुन्हा

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. रवींद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वायकर यांच्यावरील सर्व गुन्हे मागे

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकीत हॉटेल बांधण्याचा घाट घालून 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला होता. या गैरव्यवहारातून पालिकेचा महसूल बुडवल्याचा आरोप करत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र आता अखेर वायकर यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.

Big relief to MP Ravindra Vaikar, all cases filed in Jogeshwari plot scam dropped, Mumbai police gave clean cheat

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub