महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील शाळांना एप्रिल महिन्यात सुटी दिली जाणार नाही. एप्रिल महिन्यातील उन्हाळी सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यात शाळांमध्ये पूर्णवेळ शिक्षण दिले जाईल. कोरोनाच्या काळात झालेल्या नुकसानीची भरपाई याद्वारे केली जाणार आहे.Big News Summer school holidays canceled in Maharashtra; Full-time education, Corona will compensate for the time
वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील शाळांना एप्रिल महिन्यात सुटी दिली जाणार नाही. एप्रिल महिन्यातील उन्हाळी सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यात शाळांमध्ये पूर्णवेळ शिक्षण दिले जाईल. कोरोनाच्या काळात झालेल्या नुकसानीची भरपाई याद्वारे केली जाणार आहे.
महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने ही सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली आहे. याअंतर्गत एप्रिल महिन्याच्या सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या असून शिक्षकांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. ज्या मुलांनी आजीआजोबा आणि मामाच्या घरी जाण्याचा बेत आखला आहे, ट्रेनमध्ये तिकिटांचे आरक्षण केले आहे, त्यांना आता ते रद्द करावे लागेल. कारण एप्रिल महिन्यात शाळा पूर्णवेळ असणार आहेत.
कोरोनाच्या काळात दोन वर्षे शाळा बंद होत्या. दुर्गम भागात ऑनलाइन शिक्षण होऊ शकले नाही. जिथे ऑनलाइन माध्यमातून शाळा सुरू झाल्या तिथे अनेक तांत्रिक अडथळे समोर येत राहिले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे मोठे नुकसान झाले. आता शाळा सुरू झाल्या आहेत, त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मागणी पालक व विद्यार्थी करत होते. अशा स्थितीत एप्रिल महिनाभर रविवारीही शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अभ्यासक्रमात कपात करूनही पूर्ण होऊ शकला नाही
ऑनलाइन शिक्षणामुळे गेल्या वर्षी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. कोरोनाची दुसरी लाट आली, तेव्हाही स्थिती तशीच राहिली. राज्य मंडळाच्या शालेय अभ्यासक्रमातील कपात सुरूच ठेवण्यात आली आहे. राज्यातील सर्व शाळा जानेवारीपासून सुरू झाल्या. मुंबईतील शाळाही 24 जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. मुंबई महापालिकेने कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App