भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर मोठा आरोप करत त्यांच्या कुटुंबाची वाईन व्यावसायिकाशी भागीदारी असल्याचे म्हटले आहे. सोमय्या म्हणाले की, राऊतांच्या कुटुंबाने काही महिन्यांपूर्वी एका वाईन व्यावसायिकासोबत बिझनेस पार्टनरशीप केली. त्यांनी जाहीर करावं की त्यांची पत्नी, त्यांची कन्या यांच्या नावावर किती पार्टनरशीप आहे.” Big News Sanjay Raut Family Partnership With Wine Professionals, Raut’s Both Daughters Director, allegations by Kirit Somaiya
वृत्तसंस्था
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर मोठा आरोप करत त्यांच्या कुटुंबाची वाईन व्यावसायिकाशी भागीदारी असल्याचे म्हटले आहे. सोमय्या म्हणाले की, राऊतांच्या कुटुंबाने काही महिन्यांपूर्वी एका वाईन व्यावसायिकासोबत बिझनेस पार्टनरशीप केली. त्यांनी जाहीर करावं की त्यांची पत्नी, त्यांची कन्या यांच्या नावावर किती पार्टनरशीप आहे.”
Today 10.30am in a Press Conference at My Residence Office, I am releasing Important Documents, Information about Thackeray Sarkar's Leader @BJP4India @BJP4Maharashtra — Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) January 30, 2022
Today 10.30am in a Press Conference at My Residence Office, I am releasing Important Documents, Information about Thackeray Sarkar's Leader @BJP4India @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) January 30, 2022
सोमय्या पुढे म्हणाले की, ”अशोक गर्ग यांच्या मॅगपी ग्लोबल लिमिटेड या कंपनीत राऊत यांची पार्टनरशीप आहे. त्यांचा हॉटेल, पब, क्लब आणि काही ठिकाणी वाईन वितरीत करण्याचा व्यवसाय आहे. 16 एप्रिल 2021 रोजी राऊत कुटुंबीयांनी मॅगपीसोबत करारावर सह्या केल्या. विधिता आणि पूर्वशी या संजय राऊत यांच्या दोन्ही मुली या कंपनीत संचालक आहेत.” आज संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषदेत शिवसेना नेत्याशी संबंधित कागदपत्रे जाहीर करणार असल्याचं सोमय्यांनी ट्वीट केलं आहे.
सोमय्या यांनी आरोप करताना म्हटले की, ”मॅगपी कंपनीचे मूळ नाव मादक प्रायव्हेट लिमिटेड असं आहे. या कंपनीची उलाढाल वार्षिक 100 कोटींची आहे. कंपनीने 2 जानेवारी रोजी या कंपनीचा मुख्य व्यवसाय वाईन वितरीत करण्याचा असल्याचे शासनाला कळवले. त्यानंतर राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाइन ठेवण्याचा निर्णय घेतला. मी थेट आरोप करतोय, पण उत्तर कोणी देत नाही, असेही ते म्हणाले.
मोठे पवार ( शरद) म्हणतात, "गांजा आणि हर्बल गांजा मधे फरक आहे " आणि आता धाकटे पवार (अजित) सांगत आहेत, "वाईन आणि दारु मधे फरक आहे " pic.twitter.com/e3QTuLP08T — Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) January 29, 2022
मोठे पवार ( शरद) म्हणतात, "गांजा आणि हर्बल गांजा मधे फरक आहे "
आणि आता धाकटे पवार (अजित) सांगत आहेत, "वाईन आणि दारु मधे फरक आहे " pic.twitter.com/e3QTuLP08T
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) January 29, 2022
सोमय्या पुढे म्हणाले की, एवढंच नाही तर वैजनाथ देवस्थानची जमीन ठाकरे सरकारने हडप केली आहे. त्या जमिनीसाठी तहसीलदारावर दबाव आणला जात आहे. ठाकरे सरकारचा वैजनाथ देवस्थान जमिनीमध्ये थेट संबंध आहे, असा आरोपही सोमय्यांनी यावेळी केला आहे.”
निर्णय आधी माहिती असता तर शेतकऱ्यांनीही शेअर घेतले असते…मद्यक्रांतीचे खरे लाभार्थी pic.twitter.com/wCA78OMdAI — Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) January 30, 2022
निर्णय आधी माहिती असता तर शेतकऱ्यांनीही शेअर घेतले असते…मद्यक्रांतीचे खरे लाभार्थी pic.twitter.com/wCA78OMdAI
— Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) January 30, 2022
दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही असेच आरोप करत एक ट्वीट केले आहे. याट्वीटमध्ये त्यांनी राऊत यांच्या कुटुंबीयांची मॅगपी कंपनीशी भागीदारी असल्याचे कागदपत्रे शेअर केली आहेत. भातखळकर ट्वीटमध्ये म्हणाले की, “निर्णय आधी माहिती असता तर शेतकऱ्यांनीही शेअर घेतले असते… मद्यक्रांतीचे खरे लाभार्थी!”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App