शेअर मार्केट : एकाच महिन्यात कमावले 900 कोटी, ‘या’ दोन शेअर्सनी बिग बुल राकेश झुनझुनवाला यांना केले मालामाल

Big Bull rakesh jhunjhunwala portfolio makes 900 crore in a month from titan and tata motors shares

rakesh jhunjhunwala portfolio : भारतीय शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्स आणि टायटन या दोन टाटा कंपन्यांच्या शेअरमधून 900 कोटी रुपयांची कमाई केली आहे. राकेश झुनझुनवाला यांनी ही कमाई फक्त एका महिन्यात केली आहे. Big Bull rakesh jhunjhunwala portfolio makes 900 crore in a month from titan and tata motors shares


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतीय शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्स आणि टायटन या दोन टाटा कंपन्यांच्या शेअरमधून 900 कोटी रुपयांची कमाई केली आहे. राकेश झुनझुनवाला यांनी ही कमाई फक्त एका महिन्यात केली आहे.

शेअरच्या किमतीत किती वाढ

गेल्या एका महिन्यात टाटा मोटर्सच्या शेअरच्या किमतीत सुमारे 13 टक्के वाढ झाली आहे, तर टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये या कालावधीत 11.40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या तेजीमुळे राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीत या महिन्यात सुमारे 900 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

झुनझुनवालांकडे किती शेअर्स?

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे एप्रिल ते जून 2021 या तिमाहीत टाटा मोटर्सचे 3,77,50,000 शेअर्स आहेत. केवळ सप्टेंबर महिन्यात टाटा मोटर्सचा हिस्सा पाहता NSE वर त्याची किंमत 287.30 रुपयांवरून 331 रुपये प्रति स्टॉक झाली आहे. म्हणजेच प्रति शेअर 43.70 टक्के निव्वळ वाढ. त्यानुसार, राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबर 2021 मध्ये त्यांच्या टाटा मोटर्सच्या शेअरहोल्डिंगमधून सुमारे 165 कोटी रुपये कमावले.

त्याचप्रमाणे झुनझुनवाला यांच्याकडे एप्रिल ते जून 2021 या तिमाहीत टायटन कंपनीचे 3,30,10,395 शेअर्स आहेत. त्याचबरोबर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 96,40,575 शेअर्स आहेत. राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीचे टायटनमध्ये एकूण 4,26,50,970 शेअर्स आहेत.

आता जर आपण सप्टेंबर 2021 मध्ये टायटनच्या शेअरच्या किंमत पाहिली तर ती 1921.60 प्रति शेअर वरून 2092.50 रुपयांच्या पातळीवर वाढली आहे. या कालावधीत शेअरच्या किमतीत 170.90 रुपयांची वाढ झाली आहे. राकेश झुनझुनवाला यांनी या स्टॉकमधून 728.90 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. झुनझुनवाला कुटुंबाला टायटन आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समधून सुमारे तब्बल 900 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

Big Bull rakesh jhunjhunwala portfolio makes 900 crore in a month from titan and tata motors shares

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात