MNS chief Raj Thackeray Press Conference : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेअध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत पत्रकार परिषद
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं आहे. या पत्रकार परिषदेत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मनसेचे पदाधिकारी जमील शेखेचे हत्या प्रकरण .याबाबत पुढे काय झाले याचा सणसणीखेज खुलासा समोर आला आहे.Big BREAKING: Raj Thakrey press conference
हा खुलासा समोर आल्यावर आता राज ठाकरे थेट शरद पवार यांना जाब विचारणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. कारण राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांनी सुपारी दिल्याचे समोर आले आहे.
ठाण्याच्या राबोडीतील जमील शेख हत्या प्रकरणी आरोपी शूटर इरफान शेखला 11 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने चौकशीत या प्रकरणाची सर्व माहितीची समोर आली आहे. हत्येसाठी सुपारी कोणी दिली? सुपारी कोठे दिली ठाण्यात की उत्तर प्रदेशात? सूत्रधार कोण? याची उकल झाल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.
मुख्य आरोपीने जमील यांच्या हत्येसाठी दोन लाखांची सुपारी दिल्याचं उघड झालं आहे. नजीब मुल्लावर कारवाई करा, खुनाने उत्तर खुनाने योग्य नाही
मनसे पक्षाचे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या झाली , उत्तर प्रदेश पर्यंत तपास करण्यात आला , यात राष्ट्रवादीचा नगरसेवक नजीब मुल्लाचं नाव आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची प्रेसनोट आहे, त्यामध्ये नजीम मुल्लाचं नाव आहे. सत्ताधारीची लोक दिवसा ढवळा लोकांना मारत आहेत. याच नजीम मुल्लाचं नाव सूरज परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणात आहे.
ती केसही रफादफा झाली. आता पुन्हा नाव आलं आहे. आता राज्य सरकार काय करतंय हे पाहतोय.. याबाबत शरद पवारांची भेट घेणार आहे.. अशी मंडळी यांना सांभाळायची असतील, तर दुसऱ्यांचे हात बांधिल नसतात.. खुनाचे उत्तर खुनाने अशा गोष्टी महाराष्ट्रात सुरु झाल्या तर हे चित्र चांगले दिसणार नाही.
नजीब मुल्ला याच्यावर कारवाई आणि शिक्षा होणं आवश्यक आहे, त्यासाठी पवारांची भेट घेणार .
काय आहे प्रकरण ?
मनसे पदाधिकारी जमील शेख यांची 23 नोव्हेंबर 2020 रोजी दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची दुचाकीवरुन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. संबंधित आरोपीला लखनऊच्या स्पेशल टास्क फोर्सने अटक केली. टास्क फोर्सने अटक केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. या आरोपीचं नाव इरफान सोनू शेख मनसुरी असं असून यानेच दुचाकीवर मागे बसून जमील शेख यांच्यावर गोळी झाडली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App