विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काल शरद पवारांवर बारामतीत तोंडसुख घेणाऱ्या छगन भुजबळांनी आज थेट सिल्वर ओक वर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. पण त्यामुळे महाविकास आघाडीतली एक राजकीय विसंगती समोर आली. छगन भुजबळांना महाविकास आघाडीत घेण्याची तयारी काँग्रेसचे नेते माजी मंत्री नितीन राऊत यांनी दाखवली, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुखांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. Bhujbal – Pawar meeting showed inconsistency
छगन भुजबळांनी शरद पवारांशी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केल्याची माहिती स्वत: मंत्री छगन भुजबळांनी भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन दिली. मात्र प्रत्यक्षात नेमकी काय चर्चा झाली हे एक कोडंच असल्याचे बोलले जात आहे. अशातच काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी एक सूचक वक्तव्य करून चर्चेला उधाण आणले.
छगन भुजबळ महविकास आघाडीत आले तर महाविकस आघाडी त्यांचे स्वागतच करेल. आजही भुजबळांची शरद पवारांशी बंधू भावाची बांधिलकी घट्ट आहे. असे मोठं विधान नितीन राऊत यांनी केले. ते नागपूर येथे बोलत होते. छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट अचानक झालेली नाही. तर त्यामागे दोन कारण असल्याचेही नितीन राऊत म्हणाले. पहिले कारण म्हणजे काल बारामतीत भुजबळांनी शरद पवारांबद्दल जे काही वेडे वाकडे बोलले हे एक होते. तर ज्या शरद पवारांनी आपल्याला राजकारणात संधी दिली, त्या शरद पवारांबद्दल आपण असं बोललो याची खंत भुजबळांना वाटली असावी आणि त्याच पश्चातापातून भुजबळ शरद पवारांना भेटले असावेत, असे राऊत म्हणाले.
आगामी राजकारणाच्या दृष्टिकोनातून आजची भेट महत्त्वाची आहे. या भेटीतून काही नवीन राजकीय दिशा निघते का आणि भुजबळ भविष्यात कोणत्या मार्गाने जातील, याबद्दल भुजबळच सांगू शकतील. मात्र, गेले दोन अधिवेशन भुजबळ अस्वस्थ दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी तणाव असल्याचे सांगत नितीन राऊत यांनी भुजबळ महाविकास आघाडीत आले तर महाविकास आघाडी त्यांचा मन:पूर्वक स्वागतच करेल, असे सूचक वक्तव्य ही त्यांनी केले.
मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नितीन राऊत यांच्या वक्तव्याला छेद दिला. छगन भुजबळ यांनी किती प्रयत्न केले तरी आम्ही त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश देणार नाही. कारण त्यांनी बारामतीत जाऊन शरद पवारांच्या विरोधात वक्तव्य केले, असे अनिल देशमुख म्हणाले नितीन राऊत आणि अनिल देशमुख यांच्या परस्परविरोधी वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील राजकीय विसंगती समोर आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App