प्रतिनिधी
नागपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुण्यातील भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली. येत्या 2 महिन्यात या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करता येईल, अशा कालमर्यादेत काम करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. Bhoomipujan of Savitribai Phule Bhide Wada National Memorial by Chief Minister in 2 months
सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याला सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी भिडे वाड्यातील रहिवाशांची बैठक घ्यावी. आठवडाभरात त्याचा अहवाल सादर करावा आणि कालमर्यादेत स्मारक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.
या स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन येत्या दोन महिन्यांत करता येईल, या कालमर्यादेत काम करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
नागपूर विधानभवनात आयोजित या बैठकीस इतर मागासवर्ग व बहुजन विकास मंत्री अतुल सावे, आमदार छगन भुजबळ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय आणि मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App