प्रतिनिधी
नांदेड – देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपमध्ये मोठी फूट पडत असून काँग्रेसचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नांडेद जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहेBhaskar Patil Khatgaonkar BJP before Deglur by-election
देगलूर विधानसभेची आगामी पोटनिवडणूक आणि १८ महापालिकांच्या निवडणूका यांच्या पार्श्वभूमीवर सध्या सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि विरोधी भाजपमध्ये मोठा राजकीय वादंग पाहायला मिळतो आहे. या वादातून नांदेड जिल्ह्यात देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकी आधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह भारतीय जनता पक्षातील अनेक पदाधिकारी भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचे समोर येत आहे. यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.
देगलूर पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रावसाहेब अंतापूरकर यांचा विजय निश्चित आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे, अशी घोषणा भास्करराव पाटील खतगावकर यांनी केली आहे. इतकेच नाहीतर आपण भाजपचा राजीनामा देणार असून काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.
भास्करराव पाटील खतगावकर हे माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे जावई आहेत. नांदेड जिल्ह्यातील राजकारणात त्यांचा चांगला प्रभाव असल्याचे मानले जाते. देगलूर मतदारसंघात सुभाष साबणे यांना भाजपची उमेदवारी देण्यास खतगावकरांचा विरोध होता. पण भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या राजकीय प्रभावातून भाजपने शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या सुभाष साबणे यांना उमेदवारी दिल्याने खतगावकर नाराज झाल्याचे सांगण्यात येते.
परंतु, २०१९ पासूनच खतगावकर हे भाजपमध्येच काहीसे बाजूला पडल्याचे दिसून येत होते. त्यामुळे त्यांनी देगलूर पोटनिवडणूकीचे निमित्त साधून काँग्रेसमध्ये स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App