नाशिक : एकीकडे उबाठा सेनेच्या भास्कर जाधव यांना मंत्रीपदाची घाई झाली, तर दुसरीकडे महाविकास आघाडी बिघाडीची शशिकांत शिंदे यांनी कबुली दिली. त्यामुळे महायुतीतल्या एकाही मंत्र्याची विकेट काढू शकलो नाही, असे शशिकांत शिंदेंना म्हणावे लागेल. महाविकास आघाडीतल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांच्या वक्तव्यांमधून देखील महाविकास आघाडीतला विसंवाद समोर आला. Bhaskar Jadhav
एकीकडे भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघातून त्यांच्या समर्थक टप्प्याटप्प्याने बाहेर पडून भाजप किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जात असल्याने भास्कर जाधव अस्वस्थ झाले, तरी देखील त्यांना मंत्रिपदाची घाई झाली. ती त्यांनी स्वतःहून बोलून दाखवली. मी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत मंत्री होईन, नाहीतर विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेता तरी होईन, असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले. त्यामुळे उद्धव ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या शिवसेनेतल्या फुटीची शंका अधिक बळवली. उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्ष नेते पण दिले नाही तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उडी मारायची तयारी भास्कर जाधव यांनी चालवली.
शशिकांत शिंदे यांची कबुली
पण दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीतल्या बिघाडीची कबुली दिली. महाविकास आघाडीचे सगळे आमदार एकत्र राहिले असते, तर महायुतीतल्या दोन मंत्र्यांच्या विकेटी काढू शकलो असतो पण आघाडीतले आमदार एकत्र राहिले नाहीत त्यामुळे दोन मंत्र्यांच्या विकेटी बचावल्या, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला.
49 आमदार संख्येच्या बळावर भास्कर जाधव यांची मंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा फुलली, तर तेवढ्याच आमदार संख्येच्या बळावर महायुती सरकार मधल्या मंत्र्यांची विकेट काढायची बॉलिंग शशिकांत शिंदे यांनी करून घेतली, पण फडणवीस सरकारच्या मजबुतीमुळे दोघांच्याही वक्तव्यांमधली हवा निघून गेली.
त्या उलट महाविकास आघाडीने निर्माण केलेल्या अर्ध्या मुर्ध्या दबावाचा फायदा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे आणि अजितदादांच्या मंत्र्यांना झापून काढले. अजितदादांचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलून अजितदादांच्या दादागिरीला वेसण घातली.
फडणवीसांनी काढली होती विकेट
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी अचूक पुरावे देऊन महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची विकेट काढली होती पण महाविकास आघाडीला फडणवीस सरकार मधल्या एकाही मंत्र्याची विकेट काढता आली नाही. त्या उलट महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची कबुली द्यावी लागली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App