बायकोच्या आत्महत्येचा इशारा ते नारायण राणेंचा धसका; गोगावल्यांचे मंत्रीपद का अडले, वाचा त्याचा किस्सा!!


विशेष प्रतिनिधी

अलिबाग : महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकार मध्ये अजित पवार सामील झाल्यानंतर देखील शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात अद्याप संधी मिळालेली नाही. मात्र सगळेच आमदार त्याच्या प्रतीक्षेत आहेत.Bharat gogawale exposed ministerial race in shinde camp

या राजकीय पार्श्वभूमीवर नेमके कोणाचे मंत्रीपद कुठे आणि कसे अडले??, याचे भन्नाट किस्से शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी नुकतेच सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एकाने दबाव आणण्यासाठी आपल्याला मंत्रिपद दिले नाही, तर आपली बायको आत्महत्या करेल, असा इशारा दिला, तर दुसऱ्याने मला मंत्रीपद द्या, नाहीतर नारायण राणे मला कायमचे संपवून टाकतील, अशी भीती दाखवली. या सगळ्यांमध्ये मी मंत्रीपदाची प्रतीक्षा करत होतो. पण माझे गाडे अडून राहिले,असा किस्सा आमदार भरत गोगावले यांनी सांगितला.मंत्रिपदाचे सोडा पण एखाद्याला जिल्हा परिषद, पंचायत समितीचे तिकीट पक्षाने दिले नाही, तर तो थेट पक्षप्रमुखांना आपण पक्ष सोडून जातो अशी धमकी देतो, असेही गोगावले म्हणाले.

पण भरत गोगावले यांनी हा किस्सा ज्या कार्यक्रमात सांगितला, तो कार्यक्रम शिवसेनेतल्या शिंदे गटाच्या पक्षप्रवेशाचा होता. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट यांच्यासारखे आपापले पक्ष सोडून अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेश करणाऱ्या नेत्यांसमोरच भरत गोगावल्यांनी शिंदे गटातल्या मंत्रिपदांच्या स्पर्धेचा इतिहास सांगितला.

त्यामुळे भरत गोगावले हे आपल्या पक्षाला वाढवायच्या कामाला लागले आहेत की आपला पक्ष घटवायच्या बेतात आले आहेत??, अशी चर्चा सुरू झाली.

Bharat gogawale exposed ministerial race in shinde camp

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात