अपघातात एका मुलाच्या तोंडाला मार लागला होता. केंद्रिय अर्थराज्यमंत्री डॉ. कराडांनी हात रुमालाने त्याचे रक्त साफ करून त्या मुलाला धीर दिला. त्यानंतर सर्व जखमींची शासकीय रुग्णालयात रवानगी केली आणि त्यानंतर डॉ. कराड पुढील प्रवासाला लागले. BHAGWAT KARAD: Doctor-Union Minister of State for Finance! Stopped after seeing the accident in Aurangabad-Helped the child cleaned his blood
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवत एक चांगला संदेश दिला आहे.कितीही मोठे पद मिळाले तरी माणुसकी जिवंत राहिली पाहिजे,असे नेहमी बोलले जाते मात्र कराडांच्या कृतीने हे सिद्ध झाले आहे.
रविवार 24 ऑक्टोबर रोजी औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ (Aurangabad collector office) झालेला रस्त्यावरील अपघात पाहताच डॉ. भागवत कराड यांनी गाडी थांबवली.त्यांनी आधी अपघात ग्रस्तांना तपासले त्यांना मदत केली. एवढेच नव्हे तर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केल्यावरच ते पुढील प्रवासाला निघाले. केंद्रीय अर्थराज्य मंत्रीपदावर पोहोचलेल्या डॉ. कराड यांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवले.
अपघात झाल्यावर सहसा कुणी थांबत नाही. पुढे होऊन मदत करत नाहीत. त्यातला कुणी नेता, राजकारणी किंवा महत्त्वाचा अधिकारी असेल तर त्याचा ताफा कधीही अशा ठिकाणी थांबत नाही. मात्र रविवारी डॉ. भागवत कराड यांनी मात्र आदर्श दाखला दिला.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रस्त्यावर झालेला रिक्षाचा अपघात पाहताच डॉ. कराड यांनी इतर गाड्या थांबवत आधी अपघात ग्रस्त रुग्णांची तपासणी केली. या अपघातात एका मुलाच्या तोंडाला मार लागला होता. त्यामुळे रक्तस्राव सुरु होता. अशा वेळी डॉ. कराडांनी हात रुमालाने त्याचे रक्त साफ करून त्या मुलाला धीर दिला. त्यानंतर सर्व जखमींची शासकीय रुग्णालयात रवानगी केली आणि त्यानंतर डॉ. कराड पुढील प्रवासाला लागले.
डॉ. भागवत कराड हे राजकारणात येण्यापूर्वी डॉक्टर होते. त्यांच्या डॉक्टरकीच्या कारकीर्दीतील असंख्य उदाहरणे, असंख्य आठवणी सांगणारे लोक आज औरंगाबाद शहरात आहेत. अशा वेळी एक डॉक्टर या नात्याने डॉ. कराड यांनी केलेली अपघात ग्रस्ताची मदत हा आज औरंगाबाद शहरासाठी अभिमानाचा विषय ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App