पुणे शहरामध्ये पडत असलेल्या जोरदार पावसाबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन पुणेकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.Beware, Punekars! Stay home! Storm rains in Pune, Mayor Murlidhar Mohol warned
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणेकरांना मुसळधार पावसाने चांगलच झोडपले आहे.या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच फजीती झाली आहे.पुणे शहरामध्ये पडत असलेल्या जोरदार पावसाबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन पुणेकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महापौरांनी म्हटले की, पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या १२ ते १५ किमी उंचीचे ढग आहेत.काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.
अत्यंत महत्त्वाचे ! पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या १२ ते १५ किमी उंचीचे ढग आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा.#satarkalert pic.twitter.com/UiilNLxra9 — Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) October 4, 2021
अत्यंत महत्त्वाचे !
पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या १२ ते १५ किमी उंचीचे ढग आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा.#satarkalert pic.twitter.com/UiilNLxra9
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) October 4, 2021
पुढे महापौरांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे की ,शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपल्या महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मी स्वत:परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. आपण लवकरात लवकर घरी पोहोचा आणि घरी असाल तर बाहेर पडणे टाळा.
पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपल्या @PMCPune च्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. आपण लवकरात लवकर घरी पोहोचा आणि घरी असाल तर बाहेर पडणे टाळा ! — Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) October 4, 2021
पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपल्या @PMCPune च्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे.
आपण लवकरात लवकर घरी पोहोचा आणि घरी असाल तर बाहेर पडणे टाळा !
पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष ! मदतीसाठी संपर्क साधा आपत्ती व्यवस्थापन मदत व सेवा केंद्र
– ०२० – २५५०६८००/१/२/३/४ – ०२०-२५५०१२६९
दरम्यान, आज लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि रायगड जिल्ह्यात तीव्र ते अती तीव्र स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App