विशेष प्रतिनिधी
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची लिटमस टेस्ट होणार आहे. 20 वर्षानंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी फक्त ऐक्याच्या मेळाव्यात भाषणे केली होती परंतु दोघांनीही सावधगिरीची भूमिका घेत राजकीय युती जाहीर केली नव्हती. मुंबईसह महाराष्ट्रातल्या महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची ऐक्य आणि युती व्हावी यासाठी शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अनुकूल होते, पण बंधू मात्र सावध भूमिका घेत होते.
पण बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधूंना राजकीय युतीची लिटमस टेस्ट घ्यायची संधी उपलब्ध झाली म्हणून दोन्ही बंधूंनी शिवसेना आणि मनसे यांच्या राजकीय युतीला मान्यता दिली. 18 ऑगस्टला ही निवडणूक होणार आहे. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आणि मुंबई मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे यांची काही दिवसापासून युतीची चर्चा होती दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी मान्यता दिल्यानंतर त्यांनी युती केली.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता आहे त्यांच्याबरोबर मनसे आल्याने शिवसेनेची ताकद वाढली आहे आता त्यांच्यासमोर एकनाथ शिंदे आणि भाजप असे दुहेरी आव्हान असण्याची शक्यता आहे. पण मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधूंना आपली राजकीय युती प्रत्यक्षात कशी काम करते याची चाचणी घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App