संभाजीनगर पाणीप्रश्नावर 8 जूनच्या सभेपूर्वी “जाग” : मुख्यमंत्री संतापाच्या, अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाल्याच्या बातम्या!!

प्रतिनिधी

संभाजीनगर : संभाजीनगरचा पाणी प्रश्न गेल्या कित्येक महिन्यांपासून पेटला आहे. फडणवीस सरकारने जाहीर केलेली संभाजीनगरची पाणी योजना महाविकास आघाडी सरकारने गुंडाळून 2.5 वर्षे उलटून गेली आहेत. संभाजीनगरच्या नागरिकांनी जल आक्रोश मोर्चा काढून आठवडा उलटून गेला आहे. आणि आता 8 जूनला शिवसेनेची मोठी सभा आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीनगरच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्यांना “जाग” आली आहे. मुख्यमंत्री संतापल्याच्या आणि अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाल्याच्या बातम्या आता आल्या आहेत.

संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यात यावा, यासाठी रहिवाशांकडून जोरदार मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिका-यांना चांगलेच खडसावले असून, मला कारणे देत बसू नका, या प्रश्नावर तातडीने मार्ग काढा, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे अधिका-यांच्या तोंडचेच पाणी पळाले, अशा बातम्या आल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी संभाजीनगर येथे जाहीर सभा होणार आहे. त्याआधी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सरकारच्या पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडवून तिथल्या नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा झाला पाहिजे. नव्या योजना अंमलात आणण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या आहे त्या पाणीसाठ्यातून नागरिकांना कशाप्रकारे सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल, यासाठी विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना केल्या आहेत.

कंत्राटदारावर कारवाईचे आदेश

संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 1 हजार 680 कोटी रुपयांची योजना वेगाने पूर्ण करण्यात यावी यासाठी या योजनेचा आढावा घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यानी सांगितले आहे. ही योजनेला तातडीने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार निधी कमी पडू देणार नसल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच या योजनेच्या कंत्राटदाराचे संथ गतीने काम सुरू असल्याचा तक्रारी येत आहेत. त्यामुळे या कंत्राटदारावर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना दिले आहेत.

Before the June 8 meeting on the Sambhajinagar water issue, “wake up

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात