बीडच्या नेकनूर परिसरातून जनावरे घेत कंटेनर क्र.KA 51 AF 9009 यामध्ये तामिळनाडूला बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी घेऊन जात होता.Beed: Police seize container carrying animals for slaughter in foreign country, 35 bulls found
विशेष प्रतिनिधी
बीड : बीडमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने परराज्यात बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी जनावरांना घेऊन जाणारा कंटेनर पकडला आहे.या कारवाईने जनावरांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.बीडच्या नेकनूर परिसरातून जनावरे घेत कंटेनर क्र.KA 51 AF 9009 यामध्ये तामिळनाडूला बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी घेऊन जात होता.
दरम्यान बीडमध्ये अंबाजोगाई मार्गवरील मस्साजोग परिसरात हा कंटेनर पकडण्यात आला आहे.यावेळी वाहनामध्ये जनावरे कोंबून ठेवण्यात आली होती. यामध्ये कत्तलीसाठी नेण्यात येणारे तब्बल 35 बैल आढळून आले आहेत.तसेच या जनावरांसह एक कंटेनर असा 39 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान याप्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App