बीड : मनसेच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केले इंदोरीकर महाराजांचे कीर्तन , कोरोनाची नियमावली तुडवली पायदळी

 

कीर्तनाच्या ठिकाणी कोणत्याही पध्दतीची काळजी घेतलेली नाही. तसेच लोकांनी कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टंन्सिंग पाळलेलं नाही.Beed: MNS activists organized kirtan of Indorikar Maharaj, trampled on corona rules


विशेष प्रतिनिधी

बीड : राज्यात दिवसेंदिवस कोरोना वाढतच चालला आहे. दरम्यान कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने एक नियमावली ठरवली आहे.परंतु किर्तनाच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करणा-या निवृत्ती इंदोरीकर महाराजांना नियमावली पायदळी तुडवली आहे.प्रत्येक कार्यक्रमाला किती गर्दी असावी याबाबत सरकारने नियमावली ठरवली आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात नांदुरघाट गावात इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाचे आयोजन होते.कीर्तनाच्या ठिकाणी कोणत्याही पध्दतीची काळजी घेतलेली नाही. तसेच लोकांनी कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टंन्सिंग पाळलेलं नाही.त्यामुळे तिथं काही दिवसात कोरोना वाढण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान या कार्यक्रमासाठी त्यासाठी त्यांनी पोलिस आणि इतर प्रशासनाची परवानगी घेतली होती का ? याची माहिती अद्याप मिळालेली नाही.जर का प्रशासनाची परवानगी घेतली होती, तर इतकी लोक जमली कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परवानगी नसताना असा कार्यक्रम केल्याने आयोजकांवर आणि निवृत्ती इंदोरीकर महाराजांवर प्रशासन कोणती कारवाई करेल हे काही दिवसात स्पष्ट होईल.

Beed: MNS activists organized kirtan of Indorikar Maharaj, trampled on corona rules

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात