विनायक ढेरे
नाशिक : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करणार. पवारांचा बालेकिल्ला उध्वस्त करणार, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बारामतीत जाऊन एकदाच बोलले. त्यांच्या या वक्तव्याला दोन – तीन दिवस उलटूनही गेले आहेत. पण बावनकुळे यांच्या वक्तव्याची मिरची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना एवढी झोंबली आहे की ते दररोज बावनकुळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत आहेत. Bawankule spoke only once on Baramati; But Ajit Dada of NCP rohit pawar
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड ते आमदार रोहित पवार इथपर्यंतच्या नेत्यांच्या रेंजमध्ये खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार, जितेंद्र आव्हाड, मेहबूब शेख हे देखील आले आहेत. यापैकी प्रत्येकाने बारामती हा पवारांचा कसा बालेकिल्ला आहे, बारामतीतल्या मतदारांचा पवारांवरच कसा विश्वास आहे, बारामती मध्ये पवारांनी कसे सर्वाधिक काम केले आहे, वगैरे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी तर बावनकुळेच काय पण आणखीन हजार कुळे आली तरी बारामती पवारांकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही, असे म्हटले आहे, तर ज्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे, तो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा नेता मेहबूब शेख याने पवारांकडून बारामती जिंकून घेणारा अजून जन्माला यायचा आहे, असे म्हटले आहे.
अजित दादांनी बावनकुळे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने नाकारलेले तिकीट काढले आहे. बावनकुळे यांना भाजपने 2019 मध्ये तिकीट नाकारले ही खरेच. पण त्याचवेळी त्यांना त्याच निवडणुकीत संपूर्ण विदर्भाची जबाबदारी दिली होती आणि आता ते महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष झाले आहेत. मग त्यांना तिकीट नाकारणे हे जर डिमोशन मानले असेल, तर मग प्रदेशाध्यक्ष करणे हे मोठे प्रमोशन आहे हे मान्य करावे लागेल. अर्थात अजितदादांनी या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आहे.
पण बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपले “लक्ष” बारामतीवर केंद्रित केल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे. याचा अर्थ असा घ्यायचा का?, की चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत जाऊन घातलेली गोळी बरोबर बसली आहे!! त्यामुळे राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांना त्यांच्या एका दिवसातल्या एकाच वक्तव्यावर दररोज प्रतिक्रिया व्यक्त कराव्याशा वाटत आहेत. बारामतीचा बालेकिल्ला जर एवढा मजबूत असेल आणि शरद पवार यांच्या लोकसभा सदस्यत्वाच्या काळात अर्ज भरायला पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवसाची सभा एवढ्या पुरतेच शरद पवार तिथे जात असतील, तर इतक्या मजबूत बालेकिल्ल्या बद्दल राष्ट्रवादीचे नेते एवढे घायकुतीला येऊन बावनकुळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया का व्यक्त करत आहेत??, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
आजही गणेश विसर्जनाच्या दिवशी अजितदादा पवार आणि आमदार रोहित पवार यांनी बारामतीच्या जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. बारामतीच्या जनतेला कुठले बटन दाबायचे ते कळते, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. रोहित पवार यांनी तर पुढे जाऊन चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे त्यांना रोज बातम्या व्हायला हव्या आहेत, त्यामुळे ते अशी वक्तव्ये करतात, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रोहित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासारख्या अनेक भाजपच्या ज्येष्ठ – वरिष्ठांना उपदेश करणाऱ्या फेसबुक पोस्ट लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मधले त्यांचे स्थान किती? कोठे? कसे? आणि कुणामुळे?, हे सगळ्यांना माहिती आहे. पण भाजपच्या मात्र केंद्रीय नेतृत्वाला उपदेश करण्यामध्ये मात्र ते कुठेच कमी पडत नाहीत!! अशा रोहित पवारांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर टिपणी केली आहे, पण त्याला निमित्त मात्र बारामतीतल्या पराभवाच्या धास्तीचे मिळाले आहे. याचा अर्थ बारामतीत जाऊन चंद्रशेखर बावनकुळे यांनी घातलेली पहिलीच गोळी बरोबर नेमावर जाऊन बसली आहे हेच दिसून येत आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App