विशेष प्रतिनिधी
नागपूर : Chandrashekhar Bawankule काँग्रेसमध्ये कुणीही- कुणाला सहन करायला तयार नाही.त्यामुळे काँग्रेस पक्ष रोज कमजोर होत आहे, त्यांचे कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नेत्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. असमन्वय असल्याने नेत्यांना कार्यकर्त्यांना सांभाळायला कुणी तयार नाही. त्यामुळे अस्वस्थ कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. यशोमती ठाकूर या यातूनच अस्वस्थ होत बोलल्या असतील असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.Chandrashekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उबाठाच्या मुखपत्रात काय लिहून येते ते गांभीर्याने घेण्याची काही गरज नाही. अस्वस्थ लोक तिथे लिहितात त्यामुळे त्यांची काही काळजी करण्याचे काम नाही.Chandrashekhar Bawankule
कलोतींकडून मोठ्या अपेक्षा
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू जे बिनविरोध निवडून आले आहेत. ते सृजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यामधील चांगले नेतृत्व आहे. तिथल्या संपूर्ण जनतेने त्यांच्या निवडीला मान्यता दिली आहे.आता आल्हाद कलोती यांच्याकडून अपेक्षा आहे तिथे आम्ही पर्यटनाचा एक प्रकल्प करतो आहे त्यांनी तिथे मोठे डेव्हलपमेंट करावी अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हणून जनतेने त्यांना अविरोध निवडून दिले आहे.
महायुतीत मन भेद होऊ देणार नाही
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जनतेला भाजप आणि महायुतीवर विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे विकासाचा विषय घेऊन काम करत आहे. डबल इंजिन सरकारला जनतेची गरज आहे, जनता आमच्या मागे उभी आहे.मोदी-देवेंद्र फडणवीस हेच विकास करु शकतात ही जनतेची भावना आहे, म्हणून महायुतीचे उमेदवार विजयी होत आहे. 51 टक्के मते आम्हाला मिळणार आहे. काही ठिकाणी महायुती नाही तिथे आम्ही एकटे लढू पण महायुतीमध्ये मत अन् मनभेद होणार नाही यांची काळजी घेऊ.
रुग्णांसाठी काम करणाऱ्यांना जागा देणार
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कॅन्सर ग्रस्त रुग्णांसाठी काम करणाऱ्यांना महसूलच्या जागा देण्याचा आमचा विचार आहे. रुग्णांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मजबूती मिळाली तर त्या अधिक रुग्णांसाठी त्या काम करू शकतील. रुग्ण सेवा आरोग्य सेवा हे सरकारचे ब्रीद आहे म्हणूनच आम्ही जागा देण्याचा निर्णय केला आहे.
सर्व ठिकाणी प्रचाराला जाणार
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसने जर मनसेसोबत युती केली असती तर बिहारमधील मतदारांनी काँग्रेसला मतदान केले नसते, म्हणून मनसेच्या मुद्द्यावर काँग्रेसने मनसे नको अशी भूमिका घेतली, हे सर्व जाणीवपूर्वक घेतली. उद्धव ठाकरे-राज ठाकरे युतीच्या चर्चा सुरू असल्याने काँग्रेसला पर्याय नसल्याने ते सोयीचे वक्तव्य करत आहेत. आम्ही पक्षाच्या प्रचारासाठी अनेक ठिकाणी प्रवास करणार आहोत. आमचे सर्व पदाधिकारी आणि स्टार प्रचारक नगर पालिकेच्या प्रचाराला जाणार आहोत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App