विशेष प्रतिनिधी
मुंबई : Bawankule प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. मी अशा हल्ल्याचा निषेध करतो. त्यांच्यावर जो हल्ला झाला तो आम्हाला मान्य नाही. राहिला प्रश्न दीपक काटेचा तर अडीच वर्षांपूर्वी काटेच्या प्रवेशावेळी मी बोललो की हा चांगले काम करेल यांच्या पाठीशी आम्ही सर्व लोकं आहोत. कुणी पक्षात येत असेल त्यावेळी आपण हे बोलत असतो, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, आपण विचाराची लढाई लढू शकतो. पण आपले संस्कार, संक्कृती अशा भ्याड हल्ल्याला देत नाही. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याला आमचे समर्थन नाही.कुठल्याही व्यक्तीकडून याचे समर्थन नाही. दीपक काटेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. अजून काही कारवाई पोलिस करतील.
मी जातीय राजकारण करत नाही
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, दीपक काटेंनी केलेले कृत्य चुकीचे आहे, आम्ही त्याचे समर्थन करत नाही. ना भाजपचे कोणता पदाधिकारी त्यांच्या या कृतीचे समर्थन करेल. दीपक काटे दोन 3 वेळा मला भेटले. मी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. अनिल देशमुख यांनी माझ्यावर कधीही कोणता आरोप केला नाही. आम्ही संस्काराने काम करणारे कार्यकर्ते आहोत. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध आहे. आम्ही वैचारिक लढाई लढतो रस्त्यावर नाही.
सीमावर्त भागातील 14 गावांचा प्रश्न सुटला
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यातील 14 गावे हे तेलंगणा आणि महाराष्ट्र सीमेवर आहेत, ही सर्व गावे महाराष्ट्राची आहेत. त्यांचा व्यवहार जरी दोन्ही राज्यात असला तरी गावठाण मात्र आपल्या राज्यात राहिल याची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. यामुळे सीमावर्ती भागातील 14 गावांचा प्रश्न सुटणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 14 गावातील नागरिक हे 100 टक्के महाराष्ट्रातील मतदार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत त्या महाराष्ट्रातच राहणार आहेत. त्यांचे व्यवहार हा दोन्ही राज्यात होता. हे 14 गावे आमच्याकडे आहे असा रेकॉर्ड आमच्याकडे आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App