ज्या राष्ट्रीय आणि सामाजिक ऐक्याच्या हेतूने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्या राष्ट्रीय आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीकच अकोल्यातील श्री बारभाई गणपती बनला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तो समाजाला एकतेचा संदेश देत आहे.Barbhai Ganpati in Akola : A festival that has become a symbol of communal unity since pre-independence!!
श्री बारभाई गणपती अकोल्यातील श्री बारभाई गणपती अकोल्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात प्रसिद्द आहे. हा गणपती सर्व जाती धर्मांच्या ऐक्याचे प्रतीकही आहे. गणेशोत्सवामध्ये स्वतंत्रपूर्व काळापासून हा गणपती प्रथम क्रमांकावर असतो. वऱ्हाडातील सर्वात जुना गणपती म्हणून बारभाई गणपती प्रसिद्ध आहे.
बारभाई गणपतीला मनाचे स्थान
लोकमान्य टिळकांनी संपूर्ण देशात सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्यावेळी किल्ला परिसराजवळील छोट्याशा अकोला शहरात पाच – सहा गणेश मंडळाची स्थापना झाली होती. त्यावेळी मिरवणुकीमध्ये प्रथम स्थानाचा मान बारभाई गणपतीला मिळाला होता. त्याकाळी कै. भगवाननाथजी इंगळेसह बाराजातीच्या लोकांनी मिळून या गणपतीची स्थापना केली होती. तेव्हाच या गणपतीला बारभाई गणपती हे नाव मिळाले. त्या काळच्या बाराजातींच्या लोकांनी स्थापन केलेल्या गणपतीचा वारसा आजही कै. इंगळे यांच्या परिवाराने कायम ठेवला आहे.
वर्गणी गोळा केली जात नाही
या गणपतीसाठी कोणत्याच प्रकारची वर्गणी गोळा केली जात नाही. यासाठी येणारा पूर्ण खर्च इंगळे परिवार करतो, हे विशेष. बारभाई गणपतीची मूर्ती काळ्या मातीपासून बनवलेली असून, ही मूर्ती ठाकूर समाजातील मोरे नामक कारागिराने बनवली होती. या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही, मिरवणुकीमधील मानाच्या आरती नंतर परत ही मूर्ती त्याच जागी ठेवली जाते. मिरवणुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पालखीला उचलण्याचा मान भोई समाजातील लोकांचा असतो. आजूबाजूच्या खेड्यामधून बारभाई गणपती समोर जी भजनी मंडळ, दिंड्या येतात ते ही विविध समाजातील लोकांच्या असतात आणि ते याचा मोबदला म्हणून मूर्तीच्या गळ्यातील हार आणि शेला नारळा शिवाय काहीच स्विकारत नाहीत. बारभाई गणपतीच्या दर्शनाला हजारो भाविक येत असतात. येथे येणाऱ्या भक्तांना या गणपतीचे अनेक अनुभव आल्याचे भक्त सांगतात. त्यामुळेच या भक्तांची असीम श्रद्धा या बारभाई गणपतीवर आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App