बारामतीकरांचा अजितदादांना कौल, पण “ऐकले” शरद पवारांचेच!!; मग आता पवार बारामतीकरांचे “ऐकतील”??

महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने शरद पवार गटावर निर्णायक मात करून खरी राष्ट्रवादी कोणाची??, यावर जनतेकडूनच शिक्कामोर्तब करवून घेतले आहे. त्यातही बारामती तालुक्यातल्या जनतेने अजितदादांच्याच बाजूने संपूर्ण कौल दिला, पण “ऐकले” मात्र शरद पवारांचेच. मग आता पवार बारामतीकरांचे “ऐकतील” का??, असा सवाल तयार झाला आहे.Baramati taluka verdict stands behind “power”; voters followed sharad pawar’s principles

पण कौल अजितदादांना, पण “ऐकले” मात्र शरद पवारांचे मग पवार बारामतीकरांच्या “ऐकतील” का?? या शीर्षकाचा नेमका अर्थ काय??, याचे गौड बंगाल बारामतीकरांनी दिलेल्या आकड्याच्या कौलात आहे.



बारामतीतल्या 31 ग्रामपंचायतींपैकी 26 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आणि त्यापैकी 24 ग्रामपंचायत अजित पवारांच्या गटाने जिंकल्या. 2 ग्रामपंचायती भाजपच्या हाती आल्या आणि शरद पवार गटाला 0 ग्रामपंचायती मिळाल्या.

याचा नेमका अर्थ असा की, बारामतीकरांनी अजित पवारांच्या सत्तेच्या बाजूला कौल दिला आहे. ज्या सत्तेची सवय शरद पवारांनी बारामतीकरांना लावली, ती सत्ता अजित पवारांनी आज भाजपच्या वळचणीला जाऊन मिळवली. त्यामुळे बारामतीकरांनी शरद पवारांनी त्यांना लावलेल्या सवयीनुसार सत्तेच्या बाजूलाच कौल दिला. आज शरद पवारांकडे सत्ता नाही, मग त्यांचा बारामतीसाठी काय उपयोग??, असा पोक्त राजकीय विचार बारामती तालुक्यातल्या जनतेने केला. कारण सत्तेची सवय तर पवारांनीच बारामतीला गेल्या 50 वर्षांत लावली.

शरद पवार आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत खऱ्या अर्थाने विरोधात फक्त इंदिरा गांधींच्या काळात बसले. बाकीचा सर्व राजकीय काळ पवारांनी सत्तेवर किंवा सत्तेच्या वळचणीला राहूनच काढला आणि त्याचे फायदे बारामतीकरांना मिळवून दिले. ते फायदे बारामतीकरांच्या असे गळी उतरवले, की त्यांची राजकीय मानसिकताच सत्तेशी संलग्न करून टाकली. त्यामुळे आता देखील बारामती तालुक्यातल्या जनतेने पवारांचेच “ऐकून” अजितदादांच्या बाजूने कौल दिला, असे मानावे लागेल.

 यशवंतरावांचा सिद्धांत

त्याचबरोबर शरद पवारांचा राजकीय गुरूंच्या सिद्धांतानुसार जनमताचा कौल ज्या काँग्रेसकडे, ती “खरी काँग्रेस” असे म्हणून यशवंतराव चव्हाण 1981 मध्ये इंदिरा काँग्रेसमध्ये निघून गेले होते. मग आता शरद पवार देखील बारामती तालुक्यातल्या जनतेचा कौल मानून “खरी राष्ट्रवादी काँग्रेस” ही अजित पवारांकडेच आहे, असे मान्य करून अजितदादांच्या सत्तेच्या बाजूने जातील का?? हा कळीचा सवाल आहे.

सुप्रिया सुळेंचा पराभव पहायचा नसेल तर…

त्याचबरोबर अजितदादांनी बारामती तालुक्यात असे वर्चस्व सिद्ध करून दाखविले आहे की, बारामतीत शरद पवारांनी भूमिका बदलली नाही आणि खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा भाजपच्या विरोधात उभे केले, तर त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागू शकते. पवारांना जर सुप्रिया सुळे यांचा पराभव झाल्याचे पाहायचे नसेल, तर त्यांना अजितदादांच्या बाजूने जाऊन उभे राहणे भाग आहे. कारण बारामती तालुक्यातल्या जनतेने संपूर्णपणे अजितदादांच्या बाजूने कौल दिला आहे आणि जनताच जर अजितदादांच्या बाजूने असेल तर मी विरोधी बाजूला का राहू??, असे म्हणून “लोक माझे सांगाती” असे लिहिणारे शरद पवार “मी लोकांचा सांगाती”, असे सांगून अजितदादांच्या बाजूने जाऊन उभे शकतात.

Baramati taluka verdict stands behind “power”; voters followed sharad pawar’s principles

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात