नाशिक : बारामती विधानसभा निवडणुकीत उतरून आपण 7 – 8 वेळा आमदारकी जिंकली. आता आपल्याला बारामतीतून लढण्यात रस नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतला आपला वैयक्तिक “इंटरेस्ट” संपविला. पण त्याचवेळी आपला मुलगा जय पवार याच्या उमेदवारीची हॅट बारामतीच्या रिंगणात टाकून बारामतीतली लढत पवारांच्याच पुढच्या पिढ्या लढण्याची तरतूद करून टाकली. Opposition permanent loses in baramati’s pawar dynasty politics
बारामतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजितदादांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार आधीच बाशिंग बांधून बसले आहेत. त्यामुळे दोन चुलत भावांची लढत बारामतीत रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पण या सगळ्यात बारामतीतल्या लढतीचा आव आणत प्रत्यक्षात पवार काका – पुतण्यांनी बारामतीवर पवार घराण्याचाच कब्जा राहील अशी खेळी केली आहे. बारामतीतले तगडा विरोधी पक्ष या निमित्ताने पवार काका – पुतण्यांनी संपवून टाकले आहेत. भाजपने केलेल्या तथाकथित मुत्सद्दी खेळीचा हा परिणाम आहे.
Narendra Modi : विकसित भारताचा संकल्प ते वैद्यकीय शिक्षणाच्या वाढीव 75000 जागा; लाल किल्ल्यावरून काय म्हणाले मोदी??; वाचा!!
काय म्हणाले अजित पवार??
जय पवार यांना उमेदवारी देण्याच्या मागणीवर अजित पवार म्हणाले की, आमच्या भागातील जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करण्यास मी तयार आहे. मी सात, आठ वेळा निवडणूक लढलो आहे. त्यामुळे मला आता रस राहिला नाही. जय पवार यांच्याबाबत पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल. अजित पवार यांच्या या निर्णयावर पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे. तसेच जय पवार यांच्या उमेदवारीबाबत मी आता अजित पवार यांना भेटणार आहे. त्यावेळी चर्चा करणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत दादावर कुठलाही दबाव नव्हता, पार्लमेन्ट्री बोर्डाने तसा निर्णय घेतला होता, असे तटकरे यांनी म्हटले.
एकीकडे सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात चुक झाली. कारण पवार घरातच ती लढाई झाली, असे अजित पवार म्हणाले होते. ही बातमी येऊन दोन दिवस झाले नाहीत, तोच त्यांनी जय पवारांच्या उमेदवारीचे संकेत देऊन बारामतीची विधानसभेची लढत पवारांच्या घरातच होण्याचे सूचित केले. मग सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन जर अजितदादांनी चूक केली होती, तर जय पवारांना उमेदवारी देऊन पवारांच्या घरातच बारामतीची लढत करून अजितदादा बरोबर करत आहेत का??, असा सवाल तयार झाला आहे.
पण ते काही असले तरी बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यात झालेले लढत असो की विधानसभा मतदारसंघात जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार होणार असलेली लढत असो, जिंकणारा पवारच असल्याने बारामतीवर पवारांच्याच घराणेशाहीचा कब्जा कायम ठेवण्याचा डाव काका – पुतण्यांनी खेळला आहे. बारामतीत वर्षानुवर्षे पवारांच्या घराणेशाही विरोधात लढणाऱ्या विरोधकांना मजबूत करण्यात महायुतीच्या बॉसेसचे “मुत्सद्दी” राजकारण कमी पडले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App