विशेष प्रतिनिधी
पुणे : Bapusaheb Pathare वडगाव शेरीत नवा राजकीय इतिहास घडविला जाईल. उच्चांकी मतदानाने बापूसाहेब पठारे निवडून येतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
वडगावशेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणारे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी आमदार रोहित पवार यांच्या प्रचार पदयात्रेने आणि जाहीर सभेने राजकीय वातावरण ढवळून काढले.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या ८ नोव्हेंबर च्या सभेपाठोपाठ दि. ९ नोव्हेंबर रोजी लोहगाव परिसरात आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत प्रचार पदयात्रेचे आयोजन करण्यात आले .पदयात्रेच्या शेवटी जाहीर सभा झाली. आमदार पवार यांनी आक्रमकपणे विरोधकांचा समाचार घेतला.
Sanju Samson : संजू सॅमसनने डर्बनमध्ये शतक झळकावून इतिहास रचला
रोहित पवार म्हणाले,’काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात विकास होत होता.तो भाजपने थांबवला.येणाऱ्या कंपन्या दिल्लीत मुजरा करणाऱ्यांनी गुजरात मध्ये हलवल्या.त्यामुळे इथल्या होतकरू तरुणाईवर अन्याय झाला.१५ लाख युवा दरवर्षी नोकरी,रोजगार शोधत फिरत असतो.हे पाहून शांत बसू नका,लढायला हवे.बुथवर लक्ष द्या.आपले सरकार येत आहे,६० हजार कोटींचा भ्रष्टाचार उकरून काढू.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात मलिदा खाऊन पुतळा पडणार असेल, तर हे पाप कोणाचे ? असाही प्रश्न रोहित पवार यांनी विचारला.
‘फडणवीस हे सर्वात खोटे बोलणारे नेते आहेत.ते महाराष्ट्राला फसवत आहेत. ते जनरल डायर आहेत. ते अभिमन्यू नाहीत. ते तरुणांना,महिलांना न्याय देऊ शकले नाहीत. चक्रव्यूहातून सोडवू शकले नाहीत. या चक्रव्यूहातून फक्त शरद पवार हेच सोडवू शकतात.सामान्य जनता हीच त्यांची ऊर्जा आहेत . महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी ते लढत आहेत. १७० आमदार महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत. गुजरातशाही इथे येऊ देणार नाही. सभेची वीज घालविणाऱ्याची वीज आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून घालवू . विरोधकांचे आम्ही बारा वाजवू.’असाही घणाघात रोहित पवार यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App