कालीचरण महाराज यांनी व्यासपीठावरुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिवीगाळ केलीये.कालीचरण महाराजानं गांधीजींना अपशब्द म्हटल्यानंतर नथूराम गोडसेचे आभार मानलेत.’Bapu, we are ashamed, your murderer is alive’; Nawab Malik aimed hard at Kalicharan Maharaj
विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्तीसगडमधील रायपूर येथील धर्मसंसदेत महात्मा गांधींवर आक्षेपाहार्य टीका केल्यामुळे कालीचरण महाराज अडचणीत आले आहेत. कालीचरण महाराजांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे.त्यामुळे कालीचरण महाराजांवर जोरदार टीका होत आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही कालीचरण महाराजांवर टीका केली आहे. बापू हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, असं ट्विट करत नवाब मलिक यांनी कालीचरण महाराजांवर निशाणा साधला आहे.
नवाब मलिक यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. सत्य, अहिंसेला असत्य आणि हिंसक कधीही पराभूत करू शकत नाहीत. बापू हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, असं खोचक ट्विट मलिक यांनी केलं आहे.
सतय , अहिंसा को झूठे और हिंसक कभी हरा नही सकते, बापू हम शरमिंदा हैं तेरे कातिल जिंदा हैं । https://t.co/D5TPlAGKnq — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 26, 2021
सतय , अहिंसा को झूठे और हिंसक कभी हरा नही सकते, बापू हम शरमिंदा हैं तेरे कातिल जिंदा हैं । https://t.co/D5TPlAGKnq
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 26, 2021
नेमक प्रकरण काय आहे
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये जी धर्मसंसद पार पडली.यावेळी कालीचरण महाराज चांगलेच चर्चेत आले आहेत. कालीचरण महाराज यांनी व्यासपीठावरुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिवीगाळ केलीये.कालीचरण महाराजानं गांधीजींना अपशब्द म्हटल्यानंतर नथूराम गोडसेचे आभार मानलेत.
त्याच्या कृतीचं अभिनंदन केलंय.कालीचरण महाराजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींनी कालीचरण महाराजाविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App