नोव्हेंबर महिन्यात बँकेशी संबंधित तुमची काही महत्त्वाची कामे असतील तर आधी ही बातमी वाचा. धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छठ पूजा, गुरु नानक जयंती अशा अनेक सुट्ट्या नोव्हेंबर २०२१ मध्ये येणार आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण महिन्यात एकूण 17 दिवस बँका बंद राहतील. bank holidays 2021 banks will remain closed for 17 days in november check here full list of holidays
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्यात बँकेशी संबंधित तुमची काही महत्त्वाची कामे असतील तर आधी ही बातमी वाचा. धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छठ पूजा, गुरु नानक जयंती अशा अनेक सुट्ट्या नोव्हेंबर २०२१ मध्ये येणार आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण महिन्यात एकूण 17 दिवस बँका बंद राहतील. तथापि, देशात वेगवेगळ्या राज्यांच्या हिशेबाने या सुट्या कमी अधिक आहेत. म्हणजे या सर्वच सुट्या सर्व ठिकाणी लागू नसतील. या महिन्यात सलग अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे तुम्हालाही काही कमी महत्त्वाच्या गोष्टी करावयाच्या असतील, तर ही माहिती असणे गरजेचे आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोव्हेंबर महिन्यासाठी अधिकृत बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे, त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात 17 सुट्ट्या आहेत. यादरम्यान भारतातील अनेक शहरांमध्ये बँका सतत बंद राहतील. या 17 दिवसांच्या सुट्टीमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे.
आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवारी तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत, RBI ने 1, 3, 4, 5, 6, 10, 11, 12, 19, 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय महिन्यातील चार रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार सुट्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App