वांद्रे किल्ल्यावर ओली पार्टी; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती??

Ashish Shelar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : वांद्रे किल्ल्यावर ओली पार्टी झाली. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळ्या महाराष्ट्रात संताप उसळला. संबंधित ओल्या पार्टीचे आयोजक महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्रालयात होते असा आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुंबईतले नेते अखिल चित्रे यांनी केला होता. Ashish Shelar

या ओल्या पार्टी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर या ओल्या पार्टीच्या सगळ्या घटनेची शहानिशा करून जर ती पार्टी सरकारच्या कुठल्या विभागाच्या परवानगीने झाले असेल तर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. परंतु, त्या संदर्भात अद्याप कारवाई झाली नव्हती.

पण त्या पाठोपाठ त्या ओल्या पार्टीच्या आधीच्या इव्हेंट मध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार सहभागी असल्याचा फोटो समोर आला. अखिल चित्रे यांनीच तो फोटो आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केला. वांद्रे किल्ल्यावरील ओल्या पार्टीवर गेल्या 48 तासांमध्ये कारवाई का झाली नाही??, याचा खुलासा झाला असेल ना, कारण त्या ओल्या पार्टीच्या आधी इव्हेंट मध्ये आशिष शेलारच सामील झाले होते, असा आरोप आपली चित्रे यांनी केला. या आरोपांच्या समर्थनासाठी त्यांनी आशिष शेलार त्या पार्टीच्या आधीच्या इव्हेंटमध्ये हजर राहिल्याचा फोटो शेअर केला.

वांद्रे किल्ल्यावरील ओल्या पार्टी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले, तरी मंत्री आशिष शेलार यांचा कुठलाही खुलासा अद्याप समोर आलेला नाही.

Bandra Fort; Cultural Minister Ashish Shelar’s presence??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात