विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : Baldness virus बुलढाण्यातील शेगाव तालुक्यामध्ये काही गावांमध्ये केसगळतीच्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हारसमुळे तीन दिवसांतच टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेगावमधील काही गावांमध्ये ही गंभीर समस्या जाणवत आहे. राज्य सरकारकने मात्र अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील काही गावामध्ये नागरिकांना केसगळतीची समस्या जाणवत असून चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.Baldness virus
तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात व्हायरसने थैमान घातले असून, कुटुंबची कुटुंब या व्हायरसचा बळी ठरत आहेत. अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या तिन्ही गावातील शेकडो नागरिकांचे टक्कल पडले आहे. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. परंतु एवढा भयंकर प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे. त्यामुळे नागरिक उपचार करून घेत आहेत. शाम्पूने असा प्रकार घडत असावा, असे डॉक्टरांचे मत असले तरी कधीही शाम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात आहेत.
अचानक पसरलेल्या व्हायरसमुळे प्रशासन संभ्रमात
तालुका आरोग्य प्रशासनाने सर्वेक्षण करुन पाण्याचे नमुने घेतले आहे. तालुका आरोग्य विभागाकडून जिल्हा साथरोग अधिकाऱ्यांनाही या प्रकाराबाबत कळवण्यात आलेले आहे. अचानक पसरलेल्या व्हायरसमुळे आम्हीही आश्चर्यचकीत झालो आहोत, नेमका हा कोणता प्रकार आहे? याचा आम्ही शोध घेत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली भायेकर यांनी म्हटले आहे.
उपचार शिबिरे राबवण्याचे आवाहन
बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गीते यांना शेगाव तालुक्यातील शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या गंभीर समस्याची दखल घेऊन गावामध्ये उपचार शिबिरे राबवण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना सुध्दा याबाबत माहिती देण्यात आली आहे. सरकारकडून या गंभीर समस्येसाठी कोणत्या उपाययोजना राबविल्या जातात याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App